महाराष्ट्र मुंबई

खुद्द महापौरांची गाडी नो पार्किंग झोनमध्ये; दंडात्मक कारवाई होणार???

Mahadeshwar

मुंबई मुंबईमध्ये पार्किंगचे नियम फक्त नागरीकांसाठीच केलेत की काय? असा प्रश्न आता मुंबईकरांना पडला आहे. त्याच कारण असं की, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पार्किंग पॉलिसीचं उल्लंघन केल्याचं समोर आलं आहे.

विलेपार्ल्यातील ‘मालवणी आस्वाद’ हॉटेलबाहेर नो पार्किंग झोनमध्ये महाडेश्वरांनी गाडी पार्क केली होती. त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचंही समोर आलं आहे. 

मुंबई महापालिका आयुक्तांनी सध्या नवी पार्किंग पॉलिसी जारी केली आहे. या पॉलिसीचे उल्लंघन केल्यास 5 ते 15 हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे. 

नव्या पार्किंग पॉलिसीनुसार महापौरांच्या गाडीलाही 5 हजार रुपयांचा दंड झाला आहे. मात्र अद्यापही त्यांच्यावर कारवाई झाली नाही. 

गाडी नो पार्किंग झोनमध्ये पार्क नव्हती केली तर फक्त उतरण्यासाठी तिथे थांबवण्यात आली होती. त्याला नियमांचं उल्लंघन म्हणता येणार नाही, असं स्पष्टीकरण महाडेश्वरांनी दिलं आहे.  

जर मला दंडाची पावती आलीच तर मी दंड भरेल, असंही विश्वनाथ महाडेश्वर म्हणाले आहेत.