नाशिक महाराष्ट्र

महाराष्ट्रातल्या 48 खासदारांपैकी तुमचा आवडता खासदार कोण? सुप्रिया सुळेंचं लक्षवेधी उत्तर

जळगाव |  महाराष्ट्रातल्या 48 खासदारांपैकी तुमचा आवडता खासदार कोण? असा प्रश्न राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला होता. यावर एकनाथ खडसे यांच्या सुनबाई म्हणजेच रक्षा खडसे या माझ्या आवडत्या खासदार आहे, असं उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिलं.

रक्षा खडसे या जळगाव-रावेर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. या मतदारसंघातून रक्षा खडसे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर सलग दोन वेळा विजय मिळवला आहे.

48 खासदारांमध्ये सुसंस्कृत आणि अभ्यासू असलेल्या रक्षा खडसे या माझ्या आवडत्या महिला खासदार आहेत. धडपडं  नेतृत्त्व म्हणून मला त्यांचं कौतुक वाटतं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

जळगावातल्या अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात कौशल्य विकास प्रशाळा तसेच उद्योजकता विकास मंचातर्फे ‘उडान- संजीवनी नव-उद्योजकांसाठी’ या कार्यक्रमात सुळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं.

महत्त्वाच्या बातम्या-

मुस्लिम आरक्षणासाठी लवकरच कायदा करणार- नवाब मलिक

-5 हजार वर्षात कोणत्याही हिंदू राजाने मशीद पाडली नाही- नितीन गडकरी

-…म्हणून राज्य सरकार 19 जिल्हे वगळून शेतकरी कर्जमाफीची यादी जाहीर करणार!

-ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना व्हावी म्हणणाऱ्या भुजबळांना फडणवीसांचं उत्तर

-छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या श्रीपाद छिंदमवर ठाकरे सरकारची मोठी कारवाई