विधानसभा अध्यक्षांनी ‘हा’ ठराव परस्पर मांडला; शिवसेना, राष्ट्रवादी सारेच आवाक

मुंबई | विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी जनगणनेत इतर मागासवर्गीय लोकांची जातीनिहाय जणगणना करावी अशी शिफारस करणारा ठराव मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संसदीय कार्यमंत्र्यांना अंधारात ठेवून मांडला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये ताळमेळ नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे.

कामकाज सल्लागार समितीत चर्चा करुन आगामी अधिवेशनात हा ठराव मांडावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. तरीही हा ठराव विधानसभा अध्यक्षांनी वाचून दाखवला आणि एकमताने तो मंजूर करुन घेतला.

अनुसूचित जाती-जमाती यांच्या राजकीय आरक्षणाला दहा वर्षाची मुदतवाढ देणाऱ्या घटना दुरुस्तीचा ठराव संसदेत मांडण्यात आला होता. यावेळी पटोलेंनी इतर मागासवर्गीयांचा मुद्दा महत्वाचा असल्याचं म्हटलं.

पटोलेंनी हा मुद्दा उपस्थित केल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे सारेच आवाक झाले होते. कोणत्याही महत्वाच्या मुद्द्यावर सत्ताधारी किंवा विरोधक ठराव मांडत असतात. मात्र, विधानसभा अध्यक्षांनीच ठराव मांडून मंजूर करवून घेतल्याने , काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला.

महत्वाच्या बातम्या-