‘जनतेचे मुख्य प्रश्न टाळण्यासाठीच राज ठाकरे…’; नाना पटोलेंचा प्रहार

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे. अचानक राज ठाकरेंचा दौरा रद्द केल्याने राजकीय पक्षांकडून मनसेवर टीका करण्यात येत आहे. त्यातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मनसेवर निशाणा साधला आहे. तसेच महागाईवरून केंद्र सरकावर जोरदार टीका केली आहे.

देशात दररोज महागाई वाढत आहे. जनतेचे मुख्य प्रश्न टाळण्यासाठी राज ठाकरेंचा अयोध्या दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर रद्द देखील करण्यात आला, असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून होणारी इंधनदरवाढ आणि गॅस सिलिंडरचे वाढणारे दर यामुळे जनता त्रस्त आहे. हे प्रश्न टाळण्यासाठीच राज ठाकरेंचा अयोध्या दौरा आयोजित करण्यात आला होता, अशी टीका नाना पटोलेंनी केली आहे.

राज ठाकरेंनी धार्मिक विषय सोडावा. तसेच आम्हाला कोणीही धर्म शिकवू नये, असा टोलाही नाना पटोलेंनी लगावला आहे.

अयोध्या पाकिस्तानमध्ये नाही तर देशात आहे. त्यामुळे अयोध्या दौऱ्याचे राजकारण करू नये, असंही नाना पटोलेंनी सुनावलं आहे.

नाना पटोले यांनी यावेळी बोलताना राज्यसभेच्या निवडणुकीवरही भाष्य केलं आहे. संभाजी महाराजांचा आम्ही आदर करतो. आमच्यासोबत त्यांची कोणतीही बोलणी झालेली नाही, असं नाना पटोलेंनी स्पष्ट केलं.

संभाजी राजे यांच्या नावाला विरोध नाही. आमच्याकडे देखील जास्तीची मते आहेत, असं नाना पटोलेंनी सांगितलं आहे.

दरम्यान, राज्याचं महागाईवर नियंत्रण आहे. जीएसटीच्या माध्यमातून कंट्रोल आपल्या हातात घेतला आहे. कोणताही टॅक्स लावण्यात आलेला नाही. लाखो कोटी रूपये आमचे केंद्राकडे प्रलंबित आहेत. आमच्या हक्काचे पैसे लवकरात लवकर द्यावे, अशी मागणी नाना पटोलेंनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘नवीन भोंगा कोणता लावावा यावर विचारविनियम सुरू’; राष्ट्रवादीचा मनसेला जोरदार टोला

मोठी बातमी ! राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया होणार?, ‘ही’ महत्त्वाची माहिती समोर

मोठी बातमी! काॅंग्रेसचा शिवसेनेवर तब्बल 24 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

आयपीएलचा रोमांच! RCB च्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत पण…

मोठी बातमी! नवज्योतसिंग सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका