देश

पंतप्रधान मोदी राहुल गांधींना म्हणाले ‘ट्युबलाईट’!

नवी दिल्ली | लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी निवेदन केलं. यावेळी त्यांनी भाजप सरकारने केलेल्या विकास कामांचा पाढा वाचला. या बरोबरच मोदींनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांना चिमटे काढले आहेत.

मोदींनी केलेल्या वक्तव्यांमुळे सभागृहात एकच हशा पिकला होता. यावेळी राहुल गांधी जागेवर उठले व त्यांनी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोदी म्हणाले की,  मागील 30-40 मिनिटांपासून मी बोलत आहे. पण तिथे करंट पोहचायला एवढा वेळ लागला. काही ट्यूबलाइट्स असतात अशा, असा टोला त्यांनी लगावला.

मोदींच्या या टोल्याने सभागृहात हशा पिकला. भाजप खासदारांनी मोदींना बाक वाजवून प्रतिसाद दिला. चिमटे काढण्यासोबतच मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीकाही केली.

देशाला वेगाने प्रगतीपथावर नेण्याचं काम आमच्या सरकारने केलं आहे. भाजप सरकारने पहिल्या पाच वर्षांच्या काळात अनेक विकास कामं राबवली. त्यामुळेच जनतेने आमच्यावर विश्वास दाखवत पुन्हा निवडून दिलं, असंही नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-आपल्यातील भांडणं विसरुन कठोर निर्णय घ्या; अमृता फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

-पीडितेला भेटायला जाताना यशोमती ठाकूरांसोबत कार्यकर्त्यांची गर्दी

-महराष्ट्रात पवारांचे राज्य पुन्हा सुरु झाले- माधव भंडारी

-प्रदूषणासाठी मुख्यमंत्री डोंबिवलीत येताहेत हे दुर्दैव- राजू पाटील

-महिला अत्याचाराची गृहमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल; राबवणार ‘आंध्र पॅटर्न’!!