देश

CAA आणि NPR च्या विरोधामागे मतांचं राजकारण; मोदींचा आरोप

नवी दिल्ली |  नागरिकत्व कायद्याबाबत जनतेची दिशाभूल करणारी माहिती पसरवण्यात येत आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विरोधकांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. विरोधकांचे आरोप खोडून काढण्यासाठी पंतप्रधानांनी अनेक दाखले दिले.

राष्ट्रीय नागरिक नोंदणी 2010 मध्ये सुरू झाली असून त्यावरून आता काहूर माजवणं म्हणजे नागरिकांना मुर्ख बनवण्याचाच प्रकार आहे, अशी टीका मोदींनी केली. एनपीआर ज्यांनी आणलं ते आज चुकीची माहिती पसरवत आहेत. 2010 मध्ये याची सुरुवात झाली आणि आम्ही 2014 मध्ये सत्तेत आलो. आमच्याकडे सगळा दस्तावेज उपलब्ध आहे, असं म्हणत तुम्ही जनतेशी खोटं का बोलत आहात? असा सवाल पंतप्रधानांनीकाँग्रेसला केला.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेनंतर राज्यसभेतही उत्तर दिले. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी नागरिकत्व कायदा व राष्ट्रीय नागरिक नोंदणीवरून सरकारवर होत असलेल्या आरोपांना सडेतोडपणे उत्तर दिले.

जनगणना आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी या गोष्टींचा बाऊ करण्याचे कारण नाही. या गोष्टी नियमितपणे होत आल्या आहेत. असे असताना काहीजण व्होटबँकेच्या राजकारणापोटी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप मोदींनी केला.

सीएएविरोधी आंदोलनात कट्टरतावाद्यांचा शिरकाव होतोय, असं केरळचे मुख्यमंत्री म्हणत आहेत आणि दुसरीकडे त्यांचाच पक्ष दिल्लीत अशा आंदोलनांचे समर्थन करत आहेत, असा विरोधाभास मोदींनी सभागृहात सांगितला.

महत्त्वाच्या बातम्या-

-पाकमध्ये हिंदूवर होणाऱ्या हल्ल्याचा अमेरिकेने नोंदवला निषेध

-तिसरीत शिकणाऱ्या श्रेयाचं अक्षर पाहून जयंत पाटील भारावले; केलं तोंडभरून कौतुक

-भाजप वैचारिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर… त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न कळले नाहीत- जयंत पाटील

-मायाळू मंत्री बच्चू कडूंनी ‘राहुटी’त ऐकल्या चिमुकल्याच्या मागण्या!

-“चंद्रकांतदादा, मध्यावधी निवडणूक लागली तर तुम्ही कुठून लढणार पुणे की कोल्हापूर??”