Loading...
देश

माझ्या भोवती महिला भगिणींचं कवच… मज काय कुणाची भिती- नरेंद्र मोदी

मणिपूर | देशात बेरोजगारी एवढी वाढली आहे की देशातील तरुण पंतप्रधान नरेंद्र मोदींना लाठ्यांनी मारतील, असं वक्तव्य काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं होतं. यावर मोदींनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते आसाममधील कोकराझर येथील सभेत बोलत होते.

मला कितीही लाठ्या मारा. माझ्याभोवती माता-भगिनींचं सुरक्षा कवच आहे. हे कवच मला काहीही होऊ देणार नाही, असं म्हणत नरेंद्र मोदींनी राहुल यांना सुनावलं आहे. मोदींनी यावेळी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली.

Loading...

दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचार रॅलीत बोलताना राहुल यांनी मोदींचा एकेरी उल्लेख केला होता. मोदींनी देशात रोजगार निर्मिती केली नाही, तर सहा महिन्यात तरुण मोदींना लाढ्या-काढ्यांनी बडवतील, असं ते म्हणाले होते.

दरम्यान, राहुल गांधींच्या या वक्तव्याचे पडसाद लोकसभेतही पाहायला मिळाले. भाजप खासदारांनी लोकसभेत गदारोळ घातला. त्यामुळे सभागृह तहकुब करावे लागले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

-कर्जमुक्ती करून आपण शेतकऱ्यांवर उपकार करत नाही- उद्धव ठाकरे

-बजेटवरून माजी अर्थमंत्र्यांच्या टीकेचा बाण आजी अर्थमंत्र्यांवर!

-माझ्या आमदारकीचा पगार मी सामाजिक गोष्टींसाठी वापरेल- रोहित पवार

-रोहित पवारांच्या हेलिकॉप्टरच्या स्वप्नावर तरूणाचा थेट त्यांनाच प्रश्न!

-महामोर्चाआधी मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटीसा

Loading...