नाशिक महाराष्ट्र

विश्वास नांगरे-पाटील अॅक्शनमोडमध्ये; आता येऊन दाखवा बाहेर

नाशिक | कोरोनाने सर्व जगभरात हैदोस घातला आहे. सर्व देशात लॉकडाऊनच्या सूचना केल्या आहेत. मात्र तरीही काहीजण नियमांचं उल्लंघन कताना दिसत आहेत. नाशिकमध्ये देखील असे प्रकार पाहायला मिळाले. यानंतर नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी बाहेर पडणाऱ्यांना चाप लावण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.

जमावबंदी आणि संचारबंदीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांच्या गाड्या तीन महिन्यांसाठी जप्त केल्या जाणार आहेत. यासंबंधीचे आदेश सर्व अधिकाऱ्यांना दिला आहे.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आरोग्य विभागाने नागरिकांना ‘सोशल डिस्टंन्सिंग’ ठेवण्यास सांगितलं आहे. मात्र काही नागरिक याकडे दुर्लक्ष करुन सर्रासपणे बाहेर फिरताना दिसत आहेत. त्यांच्यावर नियंत्रणासाठी नांगरे पाटील यांनी थेट गाडी जप्तीचा जालीम उपाय शोधला आहे. यामुळे एकदा बाहेर फिरायला आलेल्या अतिशहाण्याची गाडी जप्त होणार आहे.

नागरिकांच्या जेवणाची गैरसोय टाळण्यासाठी शहरातील 100 हॉटेल्सला केवळ पार्सल सेवा सुरु करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कुटुंबासोबत नसलेल्या नागरिकांना संबंधित हॉटेल्सला ऑर्डर करुन आपलं जेवण मागवता येणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

-टी-20 विश्वकप विजेत्या टीमचा शिलेदार जोगिंदर शर्मासह ‘हे’ नामवंत खेळाडू कोरोना विरुद्धच्या लढाईत करताहेत पोलीस ड्युटी

-‘या’ त्रिसूत्रीनुसार कोरोनावर प्रतिबंध करण्यात येत आहे- आरोग्यमंत्री

-गरज पडल्यास संपूर्ण राज्यात “सरकारी कर्फ्यू” जाहीर करावा- मनसे

-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत साधला पुण्यातील नायडू हॉस्पिटलमधील नर्सशी संवाद

-राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दीडशे पार; आज एकाच दिवशी 28 रूग्णांची नोंद