Top news नाशिक महाराष्ट्र

श्रीमंत मनाचा बळीराजा; 3 एकर जमिनीपैकी 1 एकर गहू गरजूंसाठी देणार

नाशिक |  कोरोनाचा शेतकरी, शेतमजूर, कामगारांना जोरदार फटका बसलाय. रोजगार गेल्याने गरीब आणि मध्यमवर्गीय चिंतेत आहेत. त्यांच्यासाठी समाजातील दानशूर लोक मदतीसाठी पुढे येत आहेत. नाशिकच्या एक गरीब शेतकऱ्याने आपल्या तीन एकरांपैकी एका एकरात पिकवलेला गहू गरजू व्यक्तींसाठी देणार आहे.

निफाड तालुक्यातल्या सुकण्याच्या दत्ता पाटील यांनी त्यांच्या शेतातील गव्हाची रास गावातील गोरगरीब व हातमजुरांना खुली करून दिली. कोरोनामुळे गावातील सगळेच व्यवहार ठप्प झाल्यामुळे सगळ्यांपुढेच भाकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दत्ताराम पाटील सपत्नीक आपल्या शिवारात उभं राहून गरजूंना गव्हाचं वाटप करत आहेत. मी लहान शेतकरी आहे. आम्ही काही आर्थिकदृष्ट्या फार संपन्न नाही, पण आमच्याकडे एक भाकरी असेल, तर त्यातील अर्धी गरजूंना देऊ शकतो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, दत्ता पाटील यांच्या दानशूरपणापुढे गावातील शेतकऱ्यांना आपले अश्रू लपवता आले नाही. त्यांनीही पाटील यांचा दानशूरपणा पाहून समाधान व्यक्त केलं.

महत्वाच्या बातम्या –

-‘गरीब शेतकऱ्याच्या श्रीमंत मनाचं’ बाळासाहेब थोरातांकडून कौतुक, म्हणाले ‘आम्हाला आपला सार्थ अभिमान!’

-कोरोनाचा संकट जाईपर्यंत शिवभोजन थाळी 5 रूपयांना; मंत्री छगन भुजबळांची घोषणा

-चांगली बातमी! या दोन देशांनी कोरोनावर शोधली लस

-लॉकडाऊनसारख्या कठोर निर्णयांबाबत देशाची माफी मागतो- पंतप्रधान

-रैना झाला सर्वात मोठा दिलदार! सर्वात जास्त रक्कम कोरोना बाधीतांसाठी दान