महाराष्ट्र मुंबई

“भाजपला मोठा झटका बसणार… अनेक माजी मंत्री शिवसेनेत जाण्याच्या तयारीत”

मुंबई | भाजपची लाट आता ओसरली आहे. भाजपचे अनेक माजी मंत्री शिवसेनेत जाण्याच्या तयारीत आहेत. तसेच आठवड्याभरात मोठे फेरबदल झालेले पाहायला मिळतील, असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर भाजप महाराष्ट्रात ‘मिशन कमळ’ राबवणार असल्याची चर्चा होत आहे. मात्र, या बातम्या पेरल्या जात आहेत. महाराष्ट्रातील नेते दिल्लीत प्रचारासाठी गेले आहेत, पण राज्यात त्यांची बोट बूडणार आहे, असं ते म्हणाले आहेत.

Loading...

काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसमधून काही नेते भाजपमध्ये गेले होते. तेही आता परत येण्यास उत्सुक आहेत. ज्यांनी भाजप पक्ष वाढवण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं, तेही पक्ष बदलण्याच्या मनस्थितीत आहेत, असंही नवाब मलिक म्हणाले आहेत.

लोकांचा भाजपवरील विश्वास उडाला आहे. मोदींची लाट आता ओसरली आहे. त्यामुळे सर्व नेते सावध झाले असून ते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत, असंही ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-दिल्ली नंतर भाजपचं महाराष्ट्रात ‘मिशन कमळ’?

-केजरीवाल सरकारचं ‘दिल्ली मॉडेल’ इतर राज्यांत राबवा; शिवसेनेचा नरेंद्र मोदींना सल्ला

-आम्ही कधी एकमेकांवर कंबरेखालचे वार केले नाहीत; आव्हाडांचे भाजपवर टीकास्त्र

-मुख्यमंत्रीसाहेब, प्रथम स्वत:च्या अंगणातील घुसखोरांना हाकला; शिवसेनेला मनसेचं जाहीर आव्हान

-मुख्यमंत्रीसाहेब, प्रथम स्वत:च्या अंगणातील घुसखोरांना हाकला; शिवसेनेला मनसेचं जाहीर आव्हान