महाराष्ट्र मुंबई

राज साहेब, हिंसा करण्याची तुम्ही भाषा करत असाल तर…- नवाब मलिक

मुंबई | दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर देऊ असं कुणी बोलत असेल तर महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे . शांतीप्रिय लोकं या राज्यात राहतात. हिंसा करण्याची भाषा असेल तर आम्ही गांधीवादी असून हे राज्यात खपवून घेणार नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी राज ठाकरे यांना इशारा दिला आहे.

आज मोर्चाला मोर्चाने उत्तर मिळालं आहे. यापुढे दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल, असं वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत.

प्रत्येक पक्षाला स्वत:ची भूमिका स्विकारण्याचा अधिकार आहे. आता काही पक्ष मोर्चे काढत आहेत. मात्र, त्यांच्या मागे कोणीतरी आहे. पण याचा आम्हाला काहीही फरक पडत नाही, असं म्हणत मलिक यांनी भाजपवर टीका केली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी याच वक्तव्यावरुन राज यांना चिमटा काढला होता.  तलवारी वगैरे फार जुन्या झाल्या आहेत. आता नवे शस्त्रं आले आहेत, असं छगन भुजबळ म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या-

-नराधमाला माझ्यासमोर जाळून मारा; पीडितेच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया

-…म्हणून मागासवर्गीयांसाठी आरक्षण लागू करण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही- सर्वोच्च न्यायालय

-हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची 7 दिवस मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी

-“राजकारण व्यवसाय समजला की भूमिका, झेंडे आणि भाषा बदलतेच!”

-काॅंग्रेसच्या महिला खासदाराचा ‘हा’ व्हीडिओ तुफान व्हायरल