महाराष्ट्र मुंबई

‘रडीचा डाव खेळू नका’; जयंत पाटलांचं भाजप नेत्यांना प्रत्युत्तर

jayant patil And Fadanvis

मुंबई | राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सोशल मीडियावर अश्लील शब्दांत टीका व ट्रोलिंगविरोधात भाजप नेत्यांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली.

भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी आमचे कार्यकर्ते जशास तसं उत्तर देतील असं म्हटलंय. भाजप नेत्यांच्या या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी टीका केली आहे.

काही महिन्यांपूर्वी आघाडीत बिघाडी, देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र ही पेज सोशल मीडियावर कोण चालवत होतं. त्याच्या जाहिरातीचे पैसे कुठून आले याची माहिती भाजपने जाहीर करावी, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

आम्ही विरोधी पक्षात असताना विशिष्ठ गटाकडून आमच्यावर अश्लील टीका होत होती, त्यावेळी पोलीस तक्रारही नोंदवून घेत नव्हते. आज भाजपवर रचनात्मक टीका होत आहे तरीही भाजप नेत्यांना ते सहन होत नाही, रडीचा डाव खेळू नका अशा शब्दांत जयंत पाटील यांनी भाजप नेत्यांना टोला लगावला आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-“IFSC च्या निमित्ताने ‘महाराष्ट्र विरुद्ध गुजरात’ अशी नवी स्क्रिप्ट लिहिली जातीये परंतू जनता मूर्ख नाही”

-….तरच तुम्हाला प्रवासाचा पास मिळू शकतो, पुणे जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

-IFSC गुजरातला हलवण्याच्या मुद्द्यावरून, शरद पवारांच पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

-नागरिकांनो घाबरू नका… कोरोना बरा होतोय; उपचारानंतर डॉक्टरांनी निभावला पुन्हा रूग्णसेवेचा धर्म

-राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यात तथ्य- नितीन गडकरी