सरकारच्या सूचनांचं पालन करा, बाहेर पडू नका; सुप्रिया सुळेंचं जनतेला आवाहन

मुंबई | सरकार आणि प्रशासन आपली सर्वतोपरी काळजी घेत आहे. सर्वांनी आपली काळजी घ्यावी आणि सुरक्षित राहावं, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

अरबी समुद्रात तयार झालेलं निसर्ग हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावर येत आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील नागरिकांनी कृपया घरातून बाहेर पडू नये. घाबरुन न जाता सरकारकडून येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

निसर्ग चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला धोका निर्माण झाला असून प्रशासनासोबत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उभे रहावं, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, वादळी वाऱ्यांचा तडाखा बसल्याने सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या लोकांना तात्काळ मदतीचा हात द्यायला हवा, असंही शरद पवार यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चक्रीवादळात प्रशासनासोबत मदतीला उभं रहावं- शरद पवार

-‘कठीण प्रसंगी आम्ही तुमच्या पाठिशी आहोत’; उद्धव ठाकरेंसाठी केजरीवालांचं ट्विट

-2020 वर्ष निराशाजनक, घाबरु नका संकटाचा सामना करा- अक्षय कुमार

-पुण्यात पाचव्या टप्प्यातील सवलती जाहीर, पाहा कोणत्या गोष्टी सुरु कोणत्या बंद?

-निसर्ग परीक्षा घेतोय पण आपण ताकदीने सामना करु- उद्धव ठाकरे