राष्ट्रवादीच्या ‘त्या’ पोस्टवर नेटकऱ्यांनी उठवली टीकेची प्रचंड झोड

मुंबई | प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एक चूक झाली आहे. शुभेच्छा देताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या छायाचित्रामध्ये देशाचा चुकीचा नकाशा वापरण्यात आला आला होता पण या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रचंड टीकेची झोड उठवली त्यामूळे ही पोस्ट डिलीट करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून देशाच्या अधिकृत नकाशा ऐवजी चुकीचा नकाशा प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये जम्मू काश्मीर आणि लडाखची सीमारेषा चुकली असून, पाकव्याप्त काश्मीर तसेच अक्साई चीन हे भाग दाखवण्यात आले नाहीत.

राष्ट्रवादीनं प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना भारताचा नकाशा पोस्ट केला आहे. ज्यात खांद्यावर तिरंगा घेऊन साहसी कौशल्य दाखवणाऱ्या जवानांचा फोटो आहे. लोकशाहीचा उद्घोष करणारे भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो ! सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, असं कॅप्शन देण्यात आलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसनं चुकीचा नकाशा पोस्ट केल्याचं कळताच नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच चुकीचा नकाशा हटवावा असं काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर पंकजा मुंडेचं लाक्षणिक उपोषण

-…अन् शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसचे नेते एकाच रथात

-नाथाभाऊंनी मला मुलगा मानलं असतं तर ही वेळ आली नसती- गुलाबराव पाटील

-देश आधी मनसे, अन् आता काँग्रेस करतंय अदनान सामीच्या ‘पद्मश्री’ला विरोध

-“शरद पवार अन् बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्रात हे दोनच विठ्ठल”