कोरोना देश

गुड न्यूज! कोरोनावरील पहिली लस भारतात तयार

हैदराबाद | कोरोना व्हायरसला मात देण्यासाठी देशभरातील संशोधनकार्याला वेग आला आहे. कोरोना या विषाणूवरील देशात पहिली लस बनवण्यात ‘भारत बायोटेक’ या कंपनीला यश आलं आहे.

या लसीची मानव चाचणी घेण्यासाठी आता सरकारकडूनही परवानगी देण्यात आली आहे. हैदराबाद मधील ‘भारत बायोटेक’ कंपनीनं कोरोनावरील लस बनवल्याचा दावा केला आहे. कंपनीला या आधीही अनेक विषाणूंवरील लस बनविण्यात यश आले आहे.

कोरोनावरील लसीच्या चाचणीची सुरूवात जुलैपासून सुरू होईल, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. भारत बायोटेक या कंपनीला आजतागायत पोलिओ, रेबीज, रोटाव्हायरस, जपानी इनसेफ्लाइटिस, चिकनगुनिया आणि जिका यांसारख्या दुर्धर आजारांवर लस बनवण्यात यश मिळालं आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूवरील देशातील ही पहिली लस ठरली असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. हैदराबाद शहरातील एका सुरक्षित लॅबमध्ये ही लस बनवण्यात आली आहे. लसीची मानवी चाचणी घेण्याची परवानगी भारत बायोटेकला सोमवारी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने दिल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘कोरोना काळात भ्रष्टाचार करण्याची हीच ती वेळ’; मनसेचा शिवसेनेवर हल्लाबोल

-‘काँग्रेसला उत्तरे देण्यापेक्षा चीनला प्रत्युत्तर द्यावं’; शिवसेनेचा मोदींना सल्ला

-पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधणार, काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष

-भारताचा चीनला हिसका, टिकटॉकसह 59 अ‌ॅपवर बंदी

-जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून १ लाख २२ हजार कोरोनाबाधितांवर मोफत उपचार, आरोग्यमंत्र्यांचा दावा