चीनमध्ये तयार होतोय कोरोनापेक्षा खतरनाक व्हायरस; शास्त्रज्ञांचा धक्कादायक इशारा

बीजिंग | चीनच्या वुहानपासून सुरू झालेल्या कोरोनानं संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. कोरोनाबाधितांच्या वाढणाऱ्या आकड्यामुळे सर्वत्रच चिंतेच वातावरण आहे. अश्यातच, कोरोनापेक्षा भयानक व्हायरस चीनमधून पसरण्याचा धोका शास्त्रज्ञांकडून वर्तवला जात आहे.

वर्ल्ड अॅनिमल प्रोटेक्शनमध्ये काम करणाऱ्या शास्त्रज्ञ केट ब्लॅसजॅक यांनी सांगितलं, की चीनमध्ये अश्या वातावरणात काम केलं जात आहे ज्यामुळे कोरोनापेक्षा धोकादायक व्हायरस पसरू शकतो.

केट म्हणाल्या, की चीनमध्ये गेल्या 15 वर्षात शेती करण्याच्या पद्धतीत वेगवान बदल झाला आहे. परंपरागत शेती सोडून आक्रमक शेती केली जात आहे. ज्यात नियमांचं पालन केलं जात नाही. ज्यामुळे अँटिबायोटिक रेजिस्टेंससोबतच कोरोनापेक्षाही भयानक व्हायरस तयार होऊ शकतो.

सध्या चीन बर्ड फ्लूच्या दोन नवीन व्हायरसशी लढत आहे. याशिवाय मानव, डुक्कर आणि एव्हीयन इन्फ्लुएंझा व्हायरसने बनलेल्या स्वाईन फ्लूचीही प्रकरणे चीनमध्ये पाहायला मिळत आहेत. हे सर्व विषाणू एकत्रितपणे धोकादायक व्हायरस स्ट्रोन निर्माण करू शकतात, असंही केट म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

पुणेकरांनो सावधान!; रुग्णालयांबाबत समोर आली अत्यंत धक्कादायक बाब

रुग्णालयात ‘या’ व्यक्तीच्या आठवणीने अमिताभ बच्चन व्याकूळ; शेअर केली कविता

भारत करतोय युद्धाची तयारी? ‘या’ देशाला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरु

9 दिवसात होत्याचं नव्हतं झालं; तीन सख्ख्या भावांना कोरोनानं एकापाठोपाठ एक नेलं!

विकृतीचा कळस! अडीच वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार