धक्कादायक! कोरोनाच्या भीतीने बायकोलाच ठेवलं बाथरूममध्ये कोंडून

लिथुआनिया | जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. आतापर्यंत 3100 लोकांचा मृत्यू झाला असून 90 हजार लोक कोरोना बाधित असल्याची माहिती आहे. कोरोनामुळे जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

लिथुआनिया मधील एका व्यक्तीने कोरोना व्हायरसच्या भीतीने आपल्या पत्नीला बाथरूममध्येच कोंडून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या व्यक्तीची पत्नी इटलीवरून आलेल्या एका चिनी महिलेला भेटली होती. त्यामुळे कोरोना होईल या भीतीने त्याने पत्नीला कोंडून ठेवल्याचं कळतंय.

महिलेने फोन करून पोलिसांना हा संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्या महिलेची सुटका केल्याची माहिती आहे.

दरम्यान, संबंधित महिलेला खरंच कोरोनाचा संसर्ग झाला आहे की नाही बघण्यासाठी तिची चाचणी करण्यात आली. मात्र तिला कोरोनाची लागण झालेली नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-उत्तर कोरिया जर कोरोना व्हायरसने शिरकाव केला तर…; किम जोंग उनने अधिकाऱ्यांना धमकावलं

-शिवसेनेला वारंवार प्रेमाचा प्रस्ताव देणाऱ्या मुनगंटीवारांना जयंत पाटलांचा टोला; म्हणाले…

-‘हे’ भाजपचं हे ऑपरेशन लोटस नसून, कोरोना व्हायरस आहे; अशोक चव्हाणांचा भाजपला टोला

-कोरोनाच्या भीतीने नरेंद्र मोदींनी घेतला होळी न खेळण्याचा निर्णय!

-घरात वडीलांचा मृतदेह, अन् मुलाच्या डोळ्यासमोर भविष्याचं ध्येय!