“कलयुगात महाभारत आणि रामायण एकत्र बघायचा योग आला”

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सहकुटुंब अयोध्या दौरा करणार आहेत. महाविकास आघाडीला 100 दिवस पूर्ण होण्याच्या निमित्ताने ते प्रभुरामाचं दर्शन घेत आहेत. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

कलयुगात महाभारत आणि रामायण एकत्र बघायचा योग आला. महाभारतातला दुर्योधन रामाला भेटायला चालला, असं म्हणत निलेश राणेंनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस नेते आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार हेही अयोध्येत दाखल होणार आहेत.

राम हा सगळ्यांचा असून भारताच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक एकतेच प्रतिक आहे. त्यामुळे अयोध्येत येऊन प्रभूरामाचं दर्शन घेण्यात काही गैर नाही, असं सुनील केदार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा गाजण्याची शक्यता आहे. कारण अयोध्येतील साधू-संतांनी त्यांना विरोध केला आहे. शिवसेनेनं हिंदूत्वाला मुठमाती दिली आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-ज्येष्ठ पत्रकार मंगला विंचुर्णे-बर्दापूरकर काळाच्या पडद्याआड

-एकतर हे माध्यम सोडून द्यावं नाहीतर….; जितेंद्र जोशींना संताप अनावर

-उद्धव ठाकरेंसोबत काँग्रेस नेतेही पोहोचले आयोध्येत

-पोरीनं आई-बापाचं पांग फेडलं; पहिल्याच प्रयत्नात बनली पीएसआय!

-सरकाचा अर्थसंकल्प महिला वर्गाला पूर्णपणे निराशा करणारा; चित्रा वाघ यांची टीका