Top news महाराष्ट्र मुंबई

“संज्या म्हणतो ग्राउंड ताब्यात घ्या, आदित्य म्हणतो पावसाने बेड भिजतील; असले राज्यकर्ते….?”

nilesh

मुंबई |  मुंबईत वाढत्या कोरोना रूग्णांची संख्या लक्षात घेता क्वारंनटाईन सेंटरसाठी वानखेडे स्टेडिअम आणि ब्रेबॉर्न स्टेडिअम ताब्यात घ्यावं, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली होती. त्यांची मागणी स्विकारार्ह नसल्याचं सांगत आदित्य यांनी त्यांच्या मागणीला विरोध दर्शवला. यावरूनच भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

आईशप्पथ ह्यांना वेड लागलय… संज्या म्हणतो ग्राउंड ताब्यात घ्या त्याला प्रदूषण मंत्री आदित्य उत्तर देतो पाऊस येतोय बेड भिजतील.. हे असले राज्यकर्ते आपले तर काय भलं होणार आपलं???, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे. ट्विट करून त्यांनी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना लक्ष्य केलं आहे.

‘कोरोनाशी लढण्यासाठी मुंबईतलं वानखेडे स्टेडियमच नव्हे, ब्रेबॉर्न स्टेडियमही ताब्यात घ्यावं,’ अशी सूचना संजय राऊत यांनी दिली होती. मात्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत संजय राऊत यांची मागणी लक्षात घेतली तर मैदानांमध्ये पावसाळ्यात चिखल होतो, त्यामुळं क्वारंनटाईन सेंटरसाठी स्टेडियमचा उपयोग होणार नाही, असं म्हटलं.

दुसरीकडे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या या ट्विटरवॉरवर भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी देखील टीकास्त्र सोडलं आहे. उद्धवा अजब तुझे सरकार आणि गजब तुझा कारभार, अशा शब्दात त्यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-मजूर आणि कामगारांना आमचं सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, ते आमची जबाबदारी- अरविंद केजरीवाल

-‘श्रीमंत देश लॉकडाउन वाढवू शकतात, पण गरीब देश…’; चेतन भगतचा सरकारला टोला

-“आम्ही मोदींसारखे ड्रामेबाज नाही, जेव्हा मत हवं असतं तेव्हा ते मजुरांचे पाय धुतात”

-केंद्राने जाहीर केलेले पॅकेज म्हणजे ‘खोदा पहाड, निकला जुमला’; अशोक चव्हाणांची सडकून टीका

-उद्धवा अजब तुझे सरकार, गजब तुझा कारभार; सोमय्यांचा पुन्हा राज्य सरकारवर निशाणा