“…म्हणून उद्धव ठाकरे, तुम्हाला आणि तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल”

मुंबई | प्रसिद्ध अभिनेता सुसांत सिंह आत्महत्या प्रकरणात सध्या दिवसेंदिवस अनेक खुसाले होऊ लागले आहेत. मात्र यामध्ये मध्यंतरी या प्रकरणात मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं जातं होतं. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकस्त्र सोडलं आहे. यासंदर्भात़ त्यांनी ट्विट केलं आहे.

उद्धव ठाकरे तुमच्या मुलाचं नाव सुप्रीम कोर्टाच्या रेकॉर्ड मध्ये आलं की आदित्य ठाकरे यांचा सुशांत सिंग राजपूतच्या केस मध्ये सहभाग जाणवतो. तुम्हाला आणि तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल कारण ह्या केस मध्ये तुम्ही आणि तुमच्या मुलाने पदाचा दुरुपयोग केला आहे, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

विरोधकांनी राज्य सरकारवर सुशांत सिंह प्रकरणावरून टीका केली होती. यामध्ये जास्तीत जास्त मंत्री आदित्य ठाकरेंवर टीका करत आहेत. मात्र आदित्य ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं की, माझा सुशांतच्या आत्महत्येप्रकरणाशी काडीमात्र संंबंध नाही. त्यासोबतच शिवेसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही सांगितलेलं की आदित्य ठाकरेंचा या प्रकरणाशी काहीही संंबंध नाही.

दरम्यान, चौकशी दरम्यान आम्हाला त्यांनी कोणत्याही प्रकारची मदत केली नाही आणि सुशांतचे पोस्टमोर्टम रिपोर्टही आम्हाला दिले नाहीत, असा आरोप बिहार पोलिसांनी मुंबई पेलिसांवर न्यायालयात अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता हे प्रकरण खूपच गुंतागुंतीचं होऊ लागलेलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

मराठमोळे दिग्दर्शक निशिकांत कामत यांची प्रकृती गंभीर, चाहते चिंताग्रस्त

बॉलिवूडमधून धक्कादायक बातमी; संजू बाबूला कोरोना नाही पण झालाय ‘हा’ गंभीर आजार

सुशांतचे पोस्टमोर्टम रिपोर्ट आम्हाला दिले नाहीत…; बिहार सरकारचे मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप

पती अन् सासू सासऱ्यानेच रचला तिच्या मृत्यूचा कट; कारण ऐकूण व्हाल हैराण!

मुंबई हादरली! धावत्या कारमध्येच अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार