जसं शरद पवारांचं वय वाढतंय तसा त्यांचा हिंदू धर्मावरचा रागही वाढताना दिसतोय- निलेश राणे

मुंबई | राम मंदिराच्या भूमीपूजनाचा मुहूर्त ठरला असून 5 ऑगस्टला भूमीपूजाच्या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र राज्यात राम मंदिराच्या भूमीपूजनावरून राजकीय वातावरण तापलेलं दिसून येत आहे. अशातच भाजप नेते निलेश राणेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांच्यावर टीका केली आहे.

शरद पवार यांनी आपण राम मंदिराच्या भूमीपूजनासाठी आपल्याला आमंत्रण मिळालं तरी आपण जाणार  नसल्याचं सांगितलं आहे. यावर,  बातमीची हेडिंग वाचली तेव्हा वाटलं MIM पक्षाचा ओवेसी बोलतोय नंतर शरद पवारांच नाव दिसलं… एवढं मात्र खरं पवाराचं वय बघून कोण काय बोलत नाही पण जसं जसं वय वाढतंय तसा हिंदू धर्मावर पवार साहेबांचा राग पण वाढताना दिसतोय, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे. याआधीही राणेंनी राम मंदिरावरून पवारांवर टीका केली होती.

पवारसाहेब नेहमी हिंदूंच्या विरोधात का बोलता??? मंदिर हा हिंदूंचा श्रद्धेचा विषय आहे त्यात राष्ट्रवादीला त्रास होण्यासारखं काय?, असा सवाल निलेश राणेंनी केला आहे.

दरम्यान, राम मंदिराबाबत आता कोणताही वाद राहिलेला नाही. सुप्रीम कोर्टाने हा वाद मिटवलेला आहे. पण अजूनही भूमीपूजन सोहळ्याला जाण्याचा निर्णय घेतला नाही. मात्र मला जरी निमंत्रण मिळालं तरी आपण जाणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं होतं.

 

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीविरोधात केला गुन्हा दाखल; तक्रारीमध्ये केले ‘हे’ धक्कादायक आरोप!

राम मंदिराच्या भूमीपूजनाचं निमंत्रण मिळालं तर जाणार का?; शरद पवार म्हणाले…

भाजप शिवसेना पुन्हा एकत्र येणार?, फडणवीसांनी जरा स्पष्टच सांगितलं; म्हणाले…