नीरेचं पाणी पेटलं… बारामतीला पाणी वळवल्याच्या निषेधार्थ आज फलटण बंद

फलटण |  ठाकरे सरकारने फडणवीसांना आणखी एक दणका देणारा निर्णय बुधवारच्या कॅबिनेट बैठकीत घेतला. फडणवीस सरकारने निरा देवघर आणि गुंजवणी धरणातून बारामतीकडे जाणारं पाणी बंद केलं होतं. मात्र महाविकास आघाडी सरकारने तो निर्णय रद्द करुन, निरा उजवा आणि डावा कालव्यातील पाण्याचे समन्यायी वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ह्याच नीरेच्या पाणी प्रश्नाने चांगलाच पेट घेतला आहे.

नीरेचं पाणी बारामतीला वळवण्याच्या निर्णयाने फलटणकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. सरकारच्या या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यासाठी फलटणकरांनी आज फलटण बंदची हाक दिली आहे. पाणी समितीने आज निषेध मोर्चा काढून सरकारच्या निर्णयाचा विरोध केला.

सरकारने हा निर्णय रद्द करावा, अशा मागणीचं निवेदन पाणी समितीने फलटण तहसीलदारांना दिलं आहे. फलटण, माळशिरस आणि खंडाळ्याला पाणी मिळण्यासाठी हे निवेदन देण्यात आलं आहे. यावेळी शहरातून निषेध मोर्चा देखील काढण्यात आला होता.

निरा देवघर आणि गुंजवणी धरणाचे कालवे कार्यान्वित नसल्यामुळे, शिल्लक राहणारे पाणी निरा उजवा आणि डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्राला समान पद्धतीने देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा फायदा दोन्ही कालव्यांच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना होईल, अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर दिली आहे. भाजप सरकारने निरा डावा कालव्याचे बारामती, इंदापूर तालुक्याचे पाणी बंद केलं होतं, ते महाविकास आघाडीने सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-“15 कोटी मुसलमान जर तुमच्या विचारांचे असते तर तुमच्यावर माजी आमदार होण्याची वेळ आली नसती”

-बाळासाहेब असते तर ते काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर गेले असते का?? सुभाष देसाईंचं लक्षवेधी उत्तर

-ठाकरे सरकारचा रिमोट कंट्रोल तुमच्या हातात आहे काय? शरद पवार म्हणतात…

-राधाकृष्ण विखे लवकरच महाविकास आघाडीत; राष्ट्रवादीच्या या बड्या मंत्र्याचा दावा

-जाने कहाँ गये वो दिन… बरोबर 2 वर्षांपूर्वी पुण्यात रंगली होती राज ठाकरे-शरद पवार मुलाखत!