मध्यम, कुटीर, लघु उद्योगांसाठी निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करुन ‘स्वावलंबी भारत’ संकल्पाचा नारा दिला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी भारत अभियान पॅकेज जाहीर केलं. 20 लाख कोटी रुपयाचं हे पॅकेज आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज या पॅकेजची सविस्तर माहिती दिली.

MSME क्षेत्राला कोणत्याही गॅरंटीशिवाय 3 लाख कोटींचं कर्ज उपलब्ध होईल अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे.

20 लाख कोटींचं पॅकेज करण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध केंद्रीय मंत्र्यांशी, विविध तज्ज्ञांशी चर्चा केली अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.

दरम्यान, पगाराच्या 24 टक्के रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाणार असल्याचं सितारामन यांनी सांगितलं आहे. यामुळे 15 हजार पेक्षा कमी पगार असणाऱ्यांना सरकारकडून दिलासा मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-प्रॉमिस तोडलं म्हणणाऱ्या मेधा कुलकर्णींना चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

-“नाथाभाऊ, मुक्ताईनगरात नेऊन 2 थोबाडीत मारा, पण…”

-पंतप्रधानांना जर ठोस काही सांगायचं नसेल तर गोंधळाचं वातावरण कशाला निर्माण करता?; आंबेडकरांची टीका

-आर्थिक पॅकेजची घोषणा पोकळ ठरू नये- बाळासाहेब थोरात

-२० लाख कोटी लिहायचं तर अर्थमंत्र्यांनी लिहिलं २० लाख, नंतर…