Top news महाराष्ट्र मुंबई

“पंडित नेहरुंच्या त्या चुकीचे परिणाम आजही देश भोगतोय”

nirmala sitaraman 1d

मुंबई | काश्मीरच्या (Kashmir Issue) मुद्द्यावरून भाजपने पुन्हा एकदा काँग्रेसवर टीका केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी बुधवारी दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू (Jawahar Lal Nehru) यांच्यावर काश्मीर प्रश्नाचे संयुक्त राष्ट्रात (United Nations) आंतरराष्ट्रीयीकरण केल्याचा आरोप केला.

भारताचा अंतर्गत विषय असल्याने हा मुद्दा जागतिक मंचावर जाऊ द्यायला नको होता, असं त्या म्हणाल्या. राज्यसभेत बोलताना केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, काश्मीर प्रश्न हा मूलत: भारताशी संबंधित मुद्दा आहे. काँग्रेसने हा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेला, असं त्यांनी म्हटलं.

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हा मुद्दा संयुक्त राष्ट्रात का नेला? कारण, ब्रिटीशांनी त्यांना काही सूचना दिल्या असाव्यात की हा प्रश्न सुटणार नाही आणि पंतप्रधान नेहरूंनी तो संयुक्त राष्ट्रात नेला.

आजपर्यंत आपला शेजारी पाकिस्तान देश काँग्रेसच्या या चुकीचा दुरुपयोग करत आला आहे, अशी टीका त्यांनी केलीये.

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचं सांगून त्या म्हणाल्या, हा असा मुद्दा आहे की, जो जागतिक स्तरावर नेण्याची गरज नव्हती. ही भारताची अंतर्गत बाब आहे आणि ती आपण हाताळू शकलो असतो. आजही आम्ही तो हाताळत आहोत आणि आमच्या आणि त्यांच्या कामातील फरक दिसून येत आहे, असं त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

बंडा तात्यांकडून महात्मा गांधींचा म्हातारा म्हणून उल्लेख, म्हणाले… 

मोठी बातमी! किरीट सोमय्यांच्या ट्विटने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ 

“प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळाली तर सोनं करुन दाखवेन” 

“होय, आम्ही गांधी-नेहरू घराण्याचे गुलाम आहोत आणि शेवटच्या श्वासापर्यंत राहू” 

“एक पुतिन दिल्लीत बसलेत, ते रोज आमच्यावर मिसाईल सोडताहेत”