Loading...
कोकण महाराष्ट्र

मिसळ प्रेमींना दिलं नितेश राणेंनी हटक्या अंदाजात निमंत्रण

सिंधुदुर्ग | नितेश राणे यांच्या प्रयत्नातून 8 आणि 9 फेब्रुवारीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथे कोकणातील पहिल्या मिसळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी मिसळ प्रेमींना या महोत्सवाचे निमंत्रण दिलं आहे.

भावाशी, मिसळचं झटको होयो तर येवा वैभववाडीत, अशा शब्दात राणे यांनी मिसळ प्रेमींना साद घातली आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीट रिट्वीट केलं असून एक व्हिडीओही शेअर केला आहे.

Loading...

या महोत्सवात पुणे, कोल्हापूर भागातील प्रसिद्द असलेल्या मिसळचा कोकणकरांना आस्वाद घेता येणार आहे. त्यामुळे मिसळप्रेमींसाठी ही पर्वणीच असणार आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या 50 मिसळचा याठिकाणी आस्वाद घेता येणार आहे.

वैभववाडीत यावं आणि मिसळप्रेमींनी या विविध प्रकारच्या मिसळींचा आस्वाद घ्यावा, असं आवाहन नितेश राणे यांनी ट्वीटच्या माध्यमातून केलं आहे. दरम्यान, या महोत्सवाला मराठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारही भेट देणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-शरद पवारांनी तरुणाला विमानातून दाखवला चाकण अन् मगरपट्टा; मराठवाड्याच्या तरूणाला झालं आभाळ ठेंगणं

-… म्हणून संभाजी भिडेंना अटक होण्याची शक्यता

-“अंगाऱ्या धुपाऱ्याने मंत्री झालेल्या पाटलांचं पद दोन चार महिन्यात जाणार”

Loading...

-कर्जमाफीच्या हिशेबात बँकांचा घोळ; मंत्री बच्चू कडू यांचा धक्कादायक अहवाल

-कोर्टात जाताना हिंगणघाटच्या आरोपीने केली ‘ही’ इच्छा व्यक्त!

Loading...