Top news महाराष्ट्र मुंबई

“मातोश्रीत बसलेल्या मर्दानी फक्त 24 तास पोलिसांना सुट्टी द्यावी, मग…”

Uddhav thackeray Clean 1

मुंबई | खासदार नवणीत राणा आणि आमदार रवी राणा यांना भेटण्यासाठी जात असताना भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर खार पोलीस स्थानकाबाहेर हल्ला करण्यात आला. यानंतर राज्यातील वातावरण तापलंय. आता या घटनेवर भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यावरून नितेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना आव्हान देखील दिलंय. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलंय.

मातोश्रीमध्ये बसलेल्या मर्दांनी पोलिसांना फक्त 24 तास सुटीवर पाठवावं. मग हे सगळे हल्ले थांबतील याची आम्ही काळजी घेऊ, असं नितेश राणेंनी म्हटलंय.

जर महाराष्ट्रात पोलीस विभागाच्या संरक्षणात दररोज भाजपाच्या नेत्यांवर उद्धव ठाकरेंच्या गुंडांकडून हल्ले होणार असतील, तर त्याला शौर्य म्हणत नाहीत, असं नितेश राणे म्हणालेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. देशातील सर्वोत्तम पोलीस दल आज इतक्या दबावाखाली सरकारच्या नोकरासारखं वागतंय. लोकशाही पायाखाली तुडवली जातेय. ही परिस्थिती अत्यंत भयावह आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

जे पोलीस राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासारखे वागतायत. त्यांच्यासमोर त्यांच्या संरक्षणात जर अशाप्रकारचे हल्ले होत असतील तर हे खपवून घेतलं जाणार नाही. तसेच, मी आज सरकाला इशारा देतोय की आम्हाला तुम्ही या ठिकाणी घाबरवू शकत नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

 

 

महत्त्वाच्या बातम्या- 

“….तर त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही” 

‘…हे खपवून घेतलं जाणार नाही’; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला अत्यंत गंभीर इशारा 

Russia-Ukrain War | युक्रेनमध्ये पुतिन यांचा शेवटचा सामना?; रशियन जनरलचा मोठा खुलासा 

“देवेंद्र फडणवीसांची सध्याची अवस्था उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग अशीये” 

Sharad Pawar: शरद पवार यांची मोदी सरकारवर टीका, म्हणाले…