मोठी बातमी! नितेश राणेंची तब्येत पुन्हा बिघडली, तातडीने कोल्हापूरला हलवलं

मुंबई | राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजवणाऱ्या संतोष परब हल्ला प्रकरणात भाजप आमदार आमदार नितेश राणेंना अडचणींचा सामना करावा लागतोय. नितेश राणे यांना सध्या शिवसैनिक हल्ला प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणात नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली होती. मात्र, त्यांना दिलासा मिळाला नाही.

त्यानंतर राणे यांनी अखेर सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर राणे यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाल्याचं वाटत होतं.

मात्र, न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर नितेश राणेंची तब्येत बिघडल्याचं पहायला मिळालं होतं. त्यामुळे त्यांना जिल्हा रूग्णालयात भरती करण्यात आलं.

अशातच आता नितेश राणेंची तब्येत पुन्हा ढासळल्याचं पहायला मिळतंय. नितेश राणे यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने कोल्हापूरला हलविण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.

कार्डियाक रूग्णवाहिकेतून नितेश राणे यांनी कोल्हापूरला नेण्यात येतंय. डॉक्टरांच्या पथकासह त्यांना हलवण्यात येत आहे. नितेश राणे यांना आज दिलासा मिळण्याची शक्यता होती.

मात्र, आज सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याने नितेश राणे यांच्या अडचणी वाढल्या. त्यानंतर आता त्यांच्या छातीचं दुखणं पुन्हा वाढल्याचं समोर येत आहे.

दरम्यान, नितेश राणेंच्या जामीनासाठी आता राणेंची वकिल पुर्ण तयारी करत असल्याचं दिसतंय.

महत्वाच्या बातम्या- 

“एक हजार पाकिस्तानही लता दीदींच्या जाण्याचं नुकसान भरून काढून शकत नाही”

शाहरूखला ट्रोल करणाऱ्यांना ऊर्मिला मार्तोंडकरने सुनावलं, मोदींचा ‘तो’ फोटो केला शेअर 

दमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी; सुप्रिया-शरद पवारांचा हा फोटो ‘का’ होतोय व्हायरल? 

लता मंगेशकरांना विष देऊन मारायचा प्रयत्न झालेला?, नेमका काय प्रकार घडला होता? 

‘तो’ एक निर्णय, वाद आणि अनेक वर्ष अबोला; ‘या’ कारणामुळे लतादीदी-आशाताईंमध्ये आलेला दुरावा