“इंदुरीकर महाराज थोडा संयम ठेवा, संपूर्ण महाराष्ट्र तुमच्यासोबत”

मुंबई | निवृत्ती महाराज इंदुरीकर आपल्या प्रवचन आणि कीर्तनाच्या शैलीमुळे राज्यभर चांगलेच प्रसिद्ध आहेत. त्यांनी नुकतंच मुलगा आणि मुलीच्या जन्मासंदर्भात दिलेलं वक्तव्य वादात सापडलं असून त्यांच्यावर जोरदार टीका सुरु आहे. मात्र या सगळ्यांमध्ये त्यांची बाजू घेऊन बोलणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. सोशल मीडियावर त्यांना पाठिंब्यासाठी #IsupportIndurikar नावाचा हॅशटॅग सुरू आहे. दुसरीकडे शिवसेना नेते नितीन बानुगडे पाटील यांनी इंदुरीकर महाराज यांच्या समर्थनार्थ फेसबुक पोस्ट लिहून त्यांना आपलं समर्थन दर्शवलं आहे.

महाराज आपण कीर्तन सोडू नये. आपण कीर्तन सोडले तर महाराष्ट्राचे सामाजिक नुकसान होईल. आयुष्यात अनेकदा कौतुक होत असते, त्याप्रमाणे टीका देखील होणार… आम्हाला खात्री आहे आपला उद्देश आणि हेतू चांगलाच आहे त्यामुळे आपण थोडा काळ संयम ठेवायला हवा. महाराज संपुर्ण महाराष्ट्र तुमच्यासोबत आहे..!! अशा आशयाची फेसबुक पोस्ट प्रा.नितीन बानुगडे पाटील यांनी लिहिली आहे.

इंदुरीकर महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांच्यावर सध्या टीका होत आहे. परंतू ते आपल्या कीर्तनात अनेक चांगल्या गोष्टी देखील सांगत असतात. त्याच चांगल्या गोष्टी सांगायला लोकांनी सुरू केल्या आहेत. तशाच गोष्टी नितीन बानुगडे पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये देखील लिहिल्या आहेत.

इंदुरीकर महाराजांनी समाजाला काय शिकवले…?? हुंडा घेणं पाप आहे…. आपल्या आई बापाला विसरण पाप आहे… आपली संस्कृती आणि परंपरा विसरण म्हणजे पाप आहे… दारू पिऊन धिंगाणा घालणं पाप आहे… गाईला कसायाच्या हाती कापायला देणं पाप आहे… आपल्या पवित्र धर्माला विसरण पाप आहे… आपल्या साधू संतांना विसरण पाप आहे…
छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना विसरण पाप आहे… धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान विसरण पाप आहे…
स्त्रियांवर अत्याचार करणं पाप आहे… अशा गोष्टी इंदुरीकर महाराज सातत्याने आपल्या कीर्तनातून लोकांपुढे मांडतात. नितीन बानुगडे पाटील यांनी याच गोष्टी अधोरेकित करण्याचा प्रयत्न केला आहे.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

-भाजपला मोठा धक्का बसणार? या खासदाराची खासदारकी जाण्याची शक्यता

-महाराज तुम्ही खचू नका, संपूर्ण महाराष्ट्र तुमच्यासोबत- राष्ट्रवादी आमदार किरण लहामटे

-इंदुरीकर महाराज आपण कीर्तन सोडू नका, लोकांना स्त्रियांचा आदर करायला शिकवा- चाकणकर

-पुण्यात नवी पोस्टरबाजी… ‘हॅपी अ‌ॅनिव्हर्सरी, सॉरी आप्पू’

-ज्यांच्या विरोधात 35 वर्ष संघर्ष केला त्यांनीच माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवला- उद्धव ठाकरे