Top news पुणे महाराष्ट्र

पुण्यात आता उडत्या बस!, Nitin Gadkari यांनी सांगितली भन्नाट योजना

Nitin Gadakari 19 e1650886222441
Photo Courtesy- Facebook/ Nitin Gadkari

पुणे | देशातील प्रत्येक मोठ्या महानगरात वाहतूक (Transportation) ही कायम मोठी समस्या राहिली आहे. पुणे, मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई ही शहरे नेहमीच वाहतूक कोंडीने वैतागलेली असतात.

राज्य आणि केंद्र शासन ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक उपाययोजना करत असते. त्यात उड्डाणपूल, रस्त्यांचे रुंदीकरण आदी उपक्रम शासन राबवीत असते. आता केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी वाहतुकीची गंभीर समस्या लक्षात घेत आणखी एक नवीन घोषणा केली आहे.

यापूर्वी त्यांनी टोलनाके बंद करुन त्याच्याजागी अ‌ॅटोमॅटीक नंबर प्लेट स्कॅन कोड आणले आहेत. त्यामुळे टोलनाक्यांवरील गर्दी टाळता येणार आहे. आणि टोल संबंधितांच्या बँक खात्यावरुन परस्पर सरकारला वर्ग करण्यात येणार आहे.

आता पुण्यातील वाहतूक कोंडी समस्येवर नितीन गडकरी यांनी पुण्यात उडत्या बसेस (Trolly Bus) आणण्याची योजना आणली आहे. असे केल्याने पुण्यातील वाहतूक समस्या कमी होईल, असे गडकरी म्हणाले आहेत.

पुण्यात चांदणी चौकातील (Chandani Chowk) पूल येत्या दोन ते तीन दिवसांत पाडला जाणार आहेत. चांदणी चौक आणि इतर मुद्द्यांवर पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना गडकरी यांनी पुण्यातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी नव्या योजनांची घोषणा केली आहे.

तसेच पुण्यातील सातारा मार्ग रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार मजली उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. खाली रस्ता वरच्या दोन मजल्यांवर गाड्या आणि त्याच्यावर मेट्रो असा प्रकल्प असणार आहे.

मागील काही दिवसांत नितीन गडकरी यांनी पुणे ते बंगळूर (Pune – Bangalore) प्रवास केवळ तीन तासांत होणार असल्याचे सांगितले होते. त्या अनुषंगाने त्यांनी पुणे बंगळूर ग्रीनफिल्ड महामार्गाची घोषणा केली आहे.

पुणे – बंगळूर महामार्ग हा पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागांतून जाणार मार्ग आहे. या महामार्गामुळे या रस्त्यालगतच्या गावांना त्याचा फायदा होऊ शकतो, असे गडकरी म्हणाले.

हवेत केबलवर चालणारी बस ही भविष्यात फायदेशीर ठरु शकते. कारण इलेक्ट्रिक बस या सव्वा कोटींच्या घरात असतात, तर ट्राॅलीबस या 60 लाखांपर्यंत असतात, त्यामुळे या बसबाबत पुणे महानगर पालिकेने लवकरांत लवकर निर्णय घ्यावा, असे नितीन गडकरी म्हणाले.

INS Vikrant बद्दल ‘या’ 10 गोष्टी प्रत्येक भारतीयाला माहितच हव्यात, अभिमान वाटेल!

“2002 लोकसभा निवडणुकीपूर्वी संघाचा देशात बॉम्बस्फोट करण्याचा कट होता”; माजी प्रचारप्रमुखाचा मोठा दावा