Loading...
महाराष्ट्र मुंबई

“नरेंद्र मोदी पाठीवर दंडे खातील पण तरूणांना रोजगार देणार नाहीत”

मुंबई | देशात बेरोजगारी एवढी वाढली आहे की देशातील तरुण पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक दिवस लाठ्यांनी मारतील, असं वक्तव्य काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यावर मी सूर्यनमस्कार घालून आणि व्यायाम करून माझं शरीर फिट करून घेतो, अशी मिश्किल टिप्पणी मोदींनी गुरूवारी लोकसभेत केली होती. आज मोदींच्या त्याच वक्तव्यावरून महाराष्ट्राचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी मोदींना खोचक टोला लगावला आहे.

पंतप्रधान मोदी 6 महिने सूर्यनमस्कार करून आपली पाठ मजबूत करतील पण देशातल्या तरूणांना रोजगार देणार नाहीत, असा खोचक टोला नितीन राऊत यांनी लगावला आहे. त्यांनी ट्वीट करत मोदींना टोमणा मारलाय.

Loading...

नवी दिल्लीमध्ये प्रचारसभेत बोलताना देशातल्या बेरोजगारीवर भाष्य करताना राहुल यांनी मोदींना लक्ष्य केलं होतं. त्यांच्या टीकेवर आज संसदेत भाजप खासदारांनी जोरदार गदारोळ घातला.

दुसरीकडे नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यावर राहुल गांधींना चिमटा काढला आहे. लोक दंडे मारणार असले तरी  मी सहा महिन्यात सूर्यनमस्कार करून स्वतःला दंडाप्रुफ करून घेईन, असं मोदी म्हणालेत.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

-महाराष्ट्राला झालंय तरी काय?? अभिनेत्री मानसी नाईकची तरूणांकडून छेडछाड

-….म्हणून रोहित पवारांना तरूणाने मागितली आत्महत्या करण्याची परवानगी!

Loading...

-चंद्रपुरात पोलिसांची लॉजवर धाड; 13 कॉलेज जोडपी ताब्यात

-कामं होत नसली की फक्त बहाणे सांगायचे; फडणवीसांची अजित पवारांवर टीका

-नाईट लाईफ करून श्रीमंतांच्या पोरांची सोय केली शेतकऱ्यांचं काय??- फडणवीस

Loading...