दिल्लीत शांतता ठेवणं ही सरकारची जबाबदारी- RSS

नवी दिल्ली |  दिल्लीमध्ये शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी सरकारी आहे. सरकारने हे सुनिश्चित केले पाहिजे असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस भैय्याजी जोशी यांनी म्हटलं आहे.

कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. अशांतता असलेल्या भागांमध्ये सरकारने शांतता प्रस्थापित केली पाहिजे असं ते म्हणाले आहेत.

सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन रविवारी रात्री उत्तर पूर्व दिल्लीच्या वेगवेगळया भागांमध्ये मोठया प्रमाणावर हिंसाचार झाला. बुधवारी रात्रीपर्यंत मृतांचा आकडा 27 पर्यंत पोहोचला होता.

दिल्लीत जमावाने एका इंटेलिजन्स ब्युरोच्या अधिकाऱ्याचीही हत्या केली. नाल्यामध्ये या तरुण अधिकाऱ्याचा मृतदेह सापडल्याने कुटुंबाला जास्त दु:ख झाले आहे. शेजाऱ्यांनी स्थानिक राजकारण्यांना दोष दिला असून, कुठलीही कृती न केल्याबद्दल घोषणा दिल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

-केंद्र सरकारला खडेबोल सुनावणाऱ्या न्यायमूर्तींची बदली आम्ही केली नाही तर…- भाजप

-चंद्रकांतदादा म्हणाले, ‘रात्री निर्णय अन् सकाळी शपथ’; त्यावर अजितदादा म्हणाले..

-“इंदोरीकरांवर 15 दिवसांत गुन्हा दाखल करा, नाहीतर…”

-शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी ठाकरे सरकार उद्या जाहीर करणार

-खासदार सुप्रिया सुळेंच्या व्हॉट्सअ‌प स्टेटसला फडणवीसांचा फोटो अन् कॅप्शनमध्ये म्हणाल्या…