देश

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिला निकाल आणि झुकलं पाकिस्तान; घ्यावा लागला ‘हा’ निर्णय

Kulbhushan Jadhav

नवी दिल्ली : कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर अखेर पाकिस्तान झुकलं आहे. त्यानंतर त्यांना काउन्सिलर अॅक्सेस देण्यात आला आहे. 

काउन्सिलर अॅक्सेसद्वारे जाधव यांना राजनैतिक संपर्काचा अधिकार मिळाला आहे, अशी माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. हा भारताचा मोठा विजय मानला जात आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या आदेशावरुन 24 तासातच पाकिस्तानने हा निर्णय घेतला. यापूर्वी पाकिस्तानने जाधव यांना राजनैतिक मदत देण्यास तब्बल 16 वेळा नकार दिला होता.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालानंतर जाधव यांना राजनैतिक मदत देण्याबाबत आणि शिक्षेवर पुन्हा विचार करा, असे आदेश पाकिस्तानला दिले होते. 

आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताच्या बाजूनं निकाल लागला. 16 पैकी 15 न्यायाधीशांनी भारताच्या बाजूने निर्णय दिला. पाकिस्तानने ‘व्हिएन्ना’ कराराचे उल्लंघन केलं आहे, हे भारताने ठोस पुराव्यासह सिद्ध करुन दाखवलं.

दरम्यान, भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी जाधव यांना 2017 मध्ये पाकिस्तानने कथित हेरगिरी आणि दहशतवादी कारवायांच्या आरोपाखाली दोषी ठरवून शिक्षा सुनावली होती.

महत्वाच्या बातम्या-

-113 एनकाउंटर करणाऱ्या प्रदीप शर्मांचा राजकारणात प्रवेश???

-कर्नाटक सरकारचं भवितव्य आज ठरणार

-अजित पवारांचा यू-टर्न, अखेर विरोधकांच्या सुरात मिसळला सूर!

“कुलभूषण जाधव यांना सुखरुप आणणे हाच सरकराचा खरा पुरुषार्थ ठरेल”

-तिकीट मिळण्याआधीच रोहित पवारांची ‘विकेट’???