पोस्टाची भन्नाट योजना; दरमहिन्याला पैसे कमवण्याची संधी

मुंबई | जर तुम्ही आगामी काळात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये करू शकता. या योजनांमध्ये तुम्हाला नक्कीच चांगला परतावा मिळतो. तसेच यामध्ये गुंतवलेले पैसेही पूर्णपणे सुरक्षित असतात.

जर बँक डिफॉल्ट असेल तर तुम्हाला फक्त पाच लाख रुपये परत मिळतात. पण पोस्ट ऑफिसमध्ये असं होत नाही. याशिवाय पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये अगदी कमी रकमेतून गुंतवणूक सुरू करता येते.

पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग स्कीम किंवा मंथली इन्कम स्कीम म्हणजेच एमआयएसचाही समावेश आहे. पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत सध्या 6.6 टक्के वार्षिक व्याजदर आहे. व्याज मासिक आधारावर दिले जाते. हा व्याजदर 1 एप्रिल 2020 पासून लागू होणार आहे.

या पोस्ट ऑफिस स्कीममध्ये 1,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये, एकल खात्यात जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये आणि संयुक्त खात्यात 9 लाख रुपये गुंतवणुकीची रक्कम निश्चित करण्यात आली आहे.

या योजनेत एखादी व्यक्ती जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये गुंतवू शकते. यात त्याचा संयुक्त खात्यातील हिस्सा देखील समाविष्ट आहे. एका संयुक्त खात्यातील व्यक्तीचा हिस्सा मोजण्यासाठी, प्रत्येक संयुक्त धारकाचा समान हिस्सा असतो.

मासिक उत्पन्न योजनेंतर्गत, एक प्रौढ, तीन प्रौढ व्यक्ती एकत्रित खाते, अल्पवयीन किंवा दुर्बल मनाच्या व्यक्तीच्या वतीने पालक खाते उघडू शकतात. याशिवाय 10 वर्षांपेक्षा जास्त वयाचा अल्पवयीन व्यक्तीही स्वतःच्या नावावर खाते उघडू शकतो.

या लहान बचत योजनेत खाते उघडल्यापासून 5 वर्षांच्या शेवटी बंद केले जाऊ शकते. खाते बंद करण्यासाठी, पासबुकसह योग्य अर्ज संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये जमा करावा लागेल.

महत्वाच्या बातम्या-

“ज्या माणसाच्या बळावर तुम्ही उभे राहीले त्याचा अपमान करता, तुम्हाला…” 

‘या’ 5 राज्यात कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर दिसणार नाही नरेंद्र मोदींचा फोटो! 

‘जानेवारीच्या अखेरपर्यंत देशात दररोज…’; आयआयटीतील तज्ज्ञांचा मोठा दावा 

हिंदूचं घर जळालं तर मुस्लिमाचं घर थोडीच सुरक्षित राहील- योगी आदित्यनाथ 

Skin Care | दुधाचे हे फेसपॅक वापरा अन् आणि मिळवा तजेलदार त्वचा!