Loading...
Top news पुणे महाराष्ट्र

चिंताजनक | महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या शंभरीपार; पुण्यात आणखी 3 रुग्ण पॉझिटिव्ह

पुणे | महाराष्ट्रात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होताना दिसत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या शंभरीपार गेली आहे.

पुण्यात आणखी 3 रुग्ण सापडल्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 101 वर गेला आहे. कोरोनाचा आकडा मर्यादित ठेवण्यासाठी संचारबंदीचे पालन करण्याची आवश्यकता आहे.

Loading...

पुण्यातील तीन जणांचे कोरोना रिपोर्ट आज सकाळी पॉझिटिव्ह आले. दोन रुग्ण खाजगी हॉस्पिटलमध्ये आहेत, तर एक रुग्ण नायडू रुग्णालयात उपचार घेत आहे. पुणे शहरातील एकूण रुग्णांचा आकडा 19 वर पोहोचला आहे.

गेल्या बारा तासात महाराष्ट्रात कोरोनाच्या चार रुग्णांची भर पडली आहे. साताऱ्यात काल रात्री एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

-शाहीनबाग आंदोलनावर अखेर पोलिसांची कारवाई; सर्व आंदोलकांना हटवलं

-पेट्रोलच्या उत्पादन शुल्कात 18 रुपये तर डिझेलच्या 12 रुपयांची वाढ

-मध्य प्रदेशात सत्तापालट; शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्रिपदी विराजमान

-“आता रस्त्यांवर फिरणाऱ्यांची गय करणार नाही… सगळं तुमच्यासाठीच चाललंय एवढंही कळू नये”

-“आत्ताच्या परिस्थितीत घरी राहणं हेच देशासाठी मोठं योगदान”

Loading...

 

Loading...