Loading...
महाराष्ट्र मुंबई

धक्कादायक!!! भीक कमी आणली म्हणून वडीलांकडून मुलाला बेदम मारहाण

पालघर |  भीक कमी आणली म्हणून पित्याकडून पाच वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. सुर्या असं या मुलाचं नाव असून त्याचं कुटुंब भीक मागून आपली गुजराण करते. मात्र, रोजच्यापेक्षा कमी भीक आणल्याने संतापलेल्या पित्याने सुर्याला बेदम मारले.

‘बाबाल्हा पैसं नाय दिलं, तय त्याहानं मना कुटला’, अशी प्रतिक्रिया सुर्याने दिली आहे. विशेष म्हणजे सुर्याच्या डाव्या हाताचे हाड मोडले आहे. वडिलांनी रागाच्या भरात दंडुक्याने त्याच्या डाव्या हातावर वार केला होता.

Loading...

सुर्याचे वडील संजय त्याला दररोज भीक मागायला लावतात आणि त्याने आणलेल्या पैशात ते मोजमजा करतात, अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली आहे. वडिलांनी मारहाण केल्याने सुर्याने त्रासाने विव्हळत होता.

मंगळवारी सुर्या पालघर शहरातील बिकानेर येथे भीक मागत असताना रडत होता. त्याच्या रडण्याचे कारण काहींनी विचारले तेव्हा त्यांना घडला प्रकार समजला. संबंधितांनी त्याला त्वरित रुग्णलयात दाखल केलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-CAA आणि NPR च्या विरोधामागे मतांचं राजकारण; मोदींचा आरोप

-पाकमध्ये हिंदूवर होणाऱ्या हल्ल्याचा अमेरिकेने नोंदवला निषेध

-तिसरीत शिकणाऱ्या श्रेयाचं अक्षर पाहून जयंत पाटील भारावले; केलं तोंडभरून कौतुक

-भाजप वैचारिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर… त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न कळले नाहीत- जयंत पाटील

-मायाळू मंत्री बच्चू कडूंनी ‘राहुटी’त ऐकल्या चिमुकल्याच्या मागण्या!

Loading...