Top news औरंगाबाद महाराष्ट्र

‘अरे वाघांनो असं रडताय काय मी आहे ना…’ दुखावलेल्या कार्यकर्त्यांची पंकजांनी घातली समजूत

pankja mundhe

बीड |  भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळेल, अशी शक्यता असतानाच भाजपने त्यांना तिकीट नाकारून नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. यानंतर पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. दुखावलेल्या कार्यकर्त्यांना पंकजा मुंडे यांनी ट्विट करून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे.

पंकजा यांना तिकीट नाकारल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी तसंच चाहत्यांनी दु:ख व्यक्त केलं. यानंतर त्यांनी पंकजांना फोन लावले. परंतू पंकजांनी कुणाचेच फोन घेतले नाहीत. दिवसभरात त्यांना असे शेकडो फोन आल्यानंतर त्यांनी शेवटी कार्यकर्त्यांची ट्विटच्या माध्यमातून समजूत घातली.

आईंना, ताईंना फोन करून दुःख व्यक्त करताय ठीक आहे, पण वाघांनो असं रडताय काय मी आहे ना… ,’तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही’ अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांनी धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. पुढे त्या म्हणातात, “बस साहेबांचे आशिर्वाद आहेत. दिवसभर फोन उचलले नाहीत. कुणाकुणाला उत्तर देऊ?”.

भाजपने मला तिकीट नाकारलं याचा मला अजिबात धक्का बसला नाही, असंही त्या म्हणाल्या आहेत. म्हणजेच आपल्यासोबत असं होणार हे किंवा आपल्याला उमेदवारी मिळणार नाही हे त्यांना माहिती होतं, असंच त्यांच्या या ट्विटमधून सूचित होत आहे. नव्याने जाहीर झालेल्या उमेदवारांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

महत्वाच्या बातम्या-

-देशातल्या मुस्लिमांना दुय्यम नागरिक ठरवता येणार नाही- संजय राऊत

-देशातल्या मुस्लिमांना दुय्यम नागरिक ठरवता येणार नाही- संजय राऊत

-CBSE बोर्डाच्या 10 वी 12 वीच्या परीक्षा 1 ते 15 जुलै दरम्यान होणार- रमेश पोखरियाल

-मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची तडकाफडकी बदली!

-‘यंदा फीवाढ करु नका’; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे शिक्षण संस्थांना आदेश