Loading...
महाराष्ट्र

“दांडी मार्च ते दंडा मार! काँग्रेसने चांगलीच प्रगती केली”

मुंबई | काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात केलेल्या लाठी-काठीच्या  वादग्रस्त वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगत आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेते परेश रावल यांनी देखील राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

गेल्या काही काळात काँग्रेस पक्षाचा आकार बराच वाढला आहे. अगदी महात्मा गांधींच्या दांडी मार्चपासून राहुल गांधींच्या लाठी मारेपर्यंत, असं ट्विट करत परेश रावल यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे.

Loading...

परेश रावल यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार निर्मिती केली नाही तर सहा महिन्यात देशातले तरुण पंतप्रधान नरेंद्र मोदींना लाठी-काठीने चोपतील, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं.

 

महत्वाच्या बातम्या- 

-शरद पवारांच्या हत्येचा कट, पुणे पोलिसांकडे तक्रार दाखल

-नवऱ्याला आवडली नाही नवरीची साडी म्हणून नवऱ्याने मोडली संसाराची घडी

-…तर ओबीसी समाजाने जनगणनेवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घ्यावी- नाना पटोले

-‘झोपु’च्या नव्या कार्यालयावरुन अजित पवारांची नाराजी!

Loading...

-देशाचे पंतप्रधान गांधीजींसमोर नतमस्तक होतात पण…- जितेंन्द्र आव्हाड

Loading...