कौतूकास्पद! Parle G कंपनी पुढच्या 3आठवड्यात वाटणार 3 कोटी बिस्किट पुडे

मुंबई | कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली. या घोषनेनंतर हातावरती पोट असणारे अनेक मजूर चिंताग्रस्त झाले आहेत.

घराबाहेर पडलं नाही तर पोट कसं भरणार? असा प्रश्न अनेक मजूर आणि रस्त्यांवर राहणाऱ्यांना पडत आहे. मात्र या लोकांसाठी पार्ले कंपनी धावून आली आहे. पार्ले कंपनी पुढच्या 3 आठवड्यात 3 कोटी बिस्किट पुड्यांची वाटप करणार असल्याचं समजत आहे.

लॉकडाऊन दरम्यान रस्त्यांवर राहणारे किंवा हातावरती पोट असणारे नागरिक यांच्यापर्यंत अन्न पोहचावं या उद्देशाने पार्ले कंपनीने ही घोषणा केली. पार्ले कंपनी प्रत्येकी एक आठवड्यात 1 कोटी बिस्किट पुड्यांची वाटप करणार आहे. देशात पुढचे 3 आठवडे लॉकडाऊन असणार आहे.

दरम्यान, देशातील नागरिक या लॉकडाऊनला सकारात्मक प्रतिसादही देत आहेत. त्यानंतर अनेक कंपन्यांही परिस्थितीचं गांभीर्य जाणून मदतीचा हात पुढे करत आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

-“ आईशपथ, मी संजय राऊत यांना प्लॅटफॉर्मवर पेटी वाजवताना पाहिलं होतं”

-आरोग्यविभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळणार 4 महिन्यांचा अ‍ॅडव्हान्स पगार

-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्ते वाहतूक मंत्र्यांनी घेतला हा मोठा निर्णय!

-दिलासादायक! पुण्यात 24 तासांत 5 जण कोरोनामुक्त, 48 तासांत एकही नवा रुग्ण नाही

-ठाकरे सरकारच्या राज्यात पोलीस बेफाम, पत्रकाराला केली मारहाण