‘पारले जी’नं शेवटी निर्णय घेतलाच, किंमतीबाबत केली ‘ही’ मोठी घोषणा

मुंबई | काडेपेटीनंतर आत पार्लेजीनेही आपल्या वस्तूंची किंमत वाढवण्याचे ठरवले आहे. कच्च्या मालाच्या किंमती वाढल्याने हा निर्णय घेतल्याचं वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितलं आहे.

कंपनीने बिस्किटांच्या किमतीत जरी वाढ केली असली तरी ग्राहकांना तेवढ्याच किंमतीत बिस्किट मिळणार आहे.

कंपनीने 20 रुपयांहून अधिक असलेल्या बिस्किट आणि इतर उत्पादनांची किंमत वाढवली असली तरी उत्पादनांच्या वजनात घट केली आहे.

बिस्किट आणि इतर उत्पादनांच्या निर्मितीसाठी लागणार्‍या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने या किंमती वाढवल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

गेल्या काही वर्षात साखर, खाद्य तेलांच्या किमतीत 50-60 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळेच दरवाढीचा निर्णय घेतल्याचं अधिकार्‍यांनी म्हटलं आहे

आम्ही तुम्हाला सांगतो की Hide and Seek आणि Crackjack हे देखील पार्लेचे लोकप्रिय ब्रँड आहेत, त्यांच्या उत्पादनांच्या किमतीही वाढवण्यात आल्या आहेत.

काडीपेट्यांच्या किमतीत एक रुपयांनी वाढ झाली आहे. तब्बल 14 वर्षांनंतर ही दरवाढ झाली आहे. 1 डिसेंबरपासून एक रुपयाने काडीपेटी महाग होणार आहे.

2007 मध्ये काडीपेट्यांच्या दरात 50 पैशांनी वाढ करण्यात आली होती. ऑल इंडिया चेंबर ऑफ मॅचेस्च्या बैठकीत 1 रुपयाने दरवाढीचा निर्णय घेण्यात आला.

लाल फॉस्फरस, मेण, बॉक्स बोर्ड या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ तसेच डिझेल दरवाढीमुळे महाग झालेली वाहतूक यामुळे काडीपेट्यांची दरवाढ केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

एकनाथ शिंदे की अजित पवार?, महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कुणाकडे जाणार??? 

नाना पटोलेंचा महाविकास आघाडीला झटका, केली ‘ही’ मोठी घोषणा 

शरद पवारांनी शशिकांत शिंदेंना झापलं, म्हणाले… 

राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड; देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला 

एकाच दिवशी राष्ट्रवादीला सलग दुसरा झटका; ‘या’ बड्या नेत्यानेही दिला राजीनामा