काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल; शरद पवारांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

सोलापूर | अयोध्येतल्या ऐतिहासिक राम मंदिराच्या भूमीपूजनासाठी राम मंदिर ट्रस्टने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित केलं आहे. मोदींनीही हे निमंत्रण स्वीकारलं आहे. 5 ऑगस्ट रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमीपूजन होणार आहे. मात्र, राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार यांनी या मुद्द्यावरून मोदी सरकारवर खोचक टीका केली आहे.

कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. यामुळे देशाचं आर्थिक नुकसान वाढतच चाललं आहे. केंद्र सरकारने याकडे लक्ष द्यायला हवे. मात्र काही लोकांना वाटत मंदिर बांधून कोरोना जाईल, अशा शब्दात पवार यांनी मोदींवर घणाघाती टीका केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सोलापूरमध्ये वाढत जाणाऱ्या कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांनी विचारलेल्या राम मंदिराच्या प्रश्नावर उत्तर देत त्यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले.

कोरोना संपवला पाहिजे असं आम्हालाही वाटत. पण, कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचं हे ठरवलं पाहिजे. आमचे सहकारी खासदार दिल्लीत जाऊन या मुद्द्यावर प्रश्न मांडतील, असंही पवार यावेळी म्हणाले.

 

महत्त्वाच्या बातम्या-

धक्कादायक! मुंबईत सुरू आहे कोरोनावरील औषधांचा काळाबाजार

तुम्हा सर्वांचे खूप आभार मानायचे आहेत पण… अमिताभ बच्चन झाले भावुक!

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी रियाबाबत नवा खुलासा; पोलिसांच्या हाती लागले ‘हे’ पुरावे

विजय मल्ल्याची सर्वोच्च न्यायालयात धाव; 13 हजार कोटी परतफेड करण्याची तयारी!

बापाचं संतापजनक कृत्य; बाळंतीण लेकीनं उचललं हे धक्कादायक पाऊल