“सत्तेवर येण्यासाठी पवार साहेब पावसात भिजले, पण त्यांना एसटी कर्मचारी पावसात भिजलेले दिसले नाही”

मुंबई | ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यानं सणासुदीला प्रवाशांचे हाल पहायला मिळाले. सध्या एसटी कामगारांचा संप चिघळला असून त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारकडे वेगवेगळ्या मागण्या करत हा संप पुकारला होता. मात्र राज्य सरकारनं अजून विलीनीकरणाची मागणी मंजूर केली नाही. त्यामुळे हा संप चिघळतच चालला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी अद्याप संप मागे घेतला नाही. राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्यास सांगितलं जात आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी आता संप मागे घेणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून असतानाच आता हे आंदोलन आणखी चिघळल्याचं दिसत आहे.

भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत आझाद मैदानात या संपाचं नेतृत्व करत आहेत. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

सत्तेवर येण्यासाठी पवार साहेब पावसात भिजले, पण काल एसटी कर्मचारी पावसात भिजले, त्यांच्या डोळ्यातील अश्रू पवारांना दिसले नाहीत हे राज्याचं दुर्देव असल्याची खोचक टीका सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे.

पुढे ते म्हणाले, शरद पवार म्हणतात संपावर मध्य मार्ग काढू, पण पवारांचा मध्य मार्ग नेमका कुठे आहे हे कधीच कळू शकलेलं नाही.

विलिनीकरणाचा मुद्दा हा एक दोन दिवसात मार्गी लागणारा नाही. त्या प्रक्रियेला काही कालावधी लागणार आहे. हे लक्षात घेता कर्मचाऱ्यांनी लोकांना वेठीस धरू नये. प्रवाशांचाही विचार करावा, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, हा संप कधी संपणार याकडे सगळ्याचं लक्ष लागून आहे. यावर राज्य सरकार काय निर्णय घेईल हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “मला आता रडू येतंय, मी वेगवेगळ्या पातळ्यांवर लढतोय”

मोठी बातमी! एसटी महामंडळाचं खासगीकरण होण्याची शक्यता

 “अरे कुटुंबच्या कुटुंब रस्त्यावर आलं, त्यातही राजकारण करायला लाज वाटली नाही का?”

“शिवसेनेच्या भ्रमाचा भोपळा फुटलाय, त्यांना वाटायचं भाजप…”

 ‘दुसरा गाल पुढं करणं हे भीतीचं लक्षण नाही तर…’; कंगनाला मिळालं जोरदार प्रत्युत्तर