पुणेकरांनो पेट्रोल-डिझेल भरायला जात असाल तर जरा थांबा…! फक्त ‘यांनाच’ मिळणार पेट्रोल-डिझेल

पुणे |  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन जिकीरीचे प्रयत्न करत आहेत. याचा एक भाग म्हणून शासनाने संचारबंदीही लागू केली आहे. मात्र तरीही काही व्यक्ती रस्त्यांवर, पेट्रोल पंपांवर गर्दी करत आहेत. ही गर्दी टाळण्यासाठी पुणे शहरासह जिल्ह्यात सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेल विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्तींनाच फक्त पेट्रोल आणि डिझेल मिळणार आहे. यामध्ये पोलिस, फार्मासिस्ट, डॉक्टर तसंच पत्रकार हे समाविष्ट आहेत.

पुणे जिल्ह्यात पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर करोनाचा झपाट्यानं प्रसार झाला. पिंपरी-चिंचवड शहरातही करोना बाधित रुग्णांची संख्या वेगानं वाढली. त्यामुळे शासनाने जनतेवर विविध निर्बंध लादले आहेत.

पुण्यानंतर राज्यातील इतर भागात करोनाचे रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्य सरकारनं साथरोग प्रतिबंधक कायदा राज्यात लागू केला. त्याचबरोबर गर्दी रोखण्यासाठी संचारबंदीही लागू करण्यात आलेली आहे. मात्र, तरीही नागरिक बाहेर पडत आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

-“मी काहीही बंद केलं आहे असं सांगायला नाही तर राज्यातील जनतेला धन्यवाद द्यायला आलोय”

-“सध्या जगभरात, देशात कोरोना विषाणूचं संकट उभं असताना गुढीपाडव्याची खरेदी करायला घराबाहेर पडू नका”

-‘गो करोनिया गो’…. पाहा विनोदवीर कुशल बद्रिकेचं भन्नाट गाणं

-कोरोनानंतर चीनमध्ये आला हंता विषाणू; एकाचा मृत्यू, 32 जणांची चाचणी

-“मास्क आणि सॅनिटायझरचा काळाबाजार कराल तर जेलमध्ये टाकायलासुद्धा शासन मागेपुढे पाहणार नाही”