देशातील गरिबांना या तारखेपर्यंत मोफत धान्य देणार, नरेंद्र मोदींची मोठी घोषणा

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील जनतेला संबोधित केलं. यावेळी मोदींनी एक महत्त्वाची घोषणा केली. 30 नोव्हेंबरपर्यंत देशातील गरीबांना धान्य मोफत दिलं जाणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलंय. याचा लाभ देशातल्या 80 कोटी जनतेला होणार आहे असंही त्यांनी म्हटलंय.

यावेळी पंतप्रधान म्हणाले, “गेल्या तीन महिन्यात गरीबांना मोफत अन्नधान्य देण्यात आलं होतं. 5 किलो गहू किंवा तांदूळ, 1 किलो डाळ आणि 1 किलो चणे असं धान्य मोफत दिलं. अशाच प्रकारे नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत आपण गरीबांना धान्य मोफत देणार आहोत.”

“पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिलं जातंय. ही योजना जुलै ते नोव्हेंबर या काळातही सुरु राहणार आहे. देशात वन नेशन वन रेशन कार्ड योजनाही लवकरच लागू केली जाणारे. राज्यांना मी आवाहन करतो की या योजनेसाठीही त्यांनी सहकार्य करावं. याचा लाभ त्या गरीबांना मिळेल जे रोजगारासाठी आपलं गाव सोडून इतर राज्यांमध्ये जातात.” असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान पुढे म्हणाले, “आज गरीबांना सरकार जर मोफत धान्य देऊ शकतंय तर त्याचं श्रेय दोन वर्गांना जातं. एक तर धान्य पिकवणारा शेतकरी आणि दुसरा घटक म्हणजे आपल्या देशाचे इमानदार करदाते. तुमचे परिश्रम आणि प्रयत्न यामुळेच देश गरीबांना ही मदत करु शकतो.”

महत्वाच्या बातम्या-

-सॅमसंगचा नवा स्मार्टफोन ; कॅमेराच्या ‘या’ नव्या फिचर्स सोबत बरंच काही….

-…तर बंदीसाठी 20 जवानांच्या बलिदानाची वाट पाहात होता का?- संजय राऊत

-‘भाजपमध्ये गेलो असलो तरी…’; ‘या’ भाजप नेत्याने पवारांची बाजू घेत पडळकरांना झापलं

-‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेनेची अमित शहांवर टीका, म्हणाले…

-‘मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवू’, कराचीतून फोन आल्याचा संशय