मावळे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे माध्यम झाले तसे….- नरेंद्र मोदींनी काढली महाराजांची आठवण

अयोध्या | अयोध्येतील राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा मोठ्या थाटात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पायाभरणीचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर मोदींनी देशाला संबोधित करताना महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आठवण काढली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थपानेसाठी मावळ्यांनी सहकार्य केलं, महाराज सोहेलदेव यांना लढाईमध्ये गरिबांनी आणि मागासलेल्या लोकांनी मदत केली, दलित, मागास, आदिवासींसह सर्वच लोकांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात गांधीजींनी सहकार्य केलं, अगदी याचप्रमाणे देशभरातील लोकांच्या सहकार्यामुळे राम मंदिराच्या उभारणीचं हे पवित्र काम सुरु झालं असल्याचं मोदी यांनी म्हटलं.

आज संपूर्ण भारत राममय झाला आहे. संपूर्ण देश रोमांचित आहे, प्रत्येकजण भावूक आहे. कित्येक दशकांची प्रतिक्षा आज संपत आहे. करोडो लोकांना आज आपण हा क्षण जिवंतपणी पाहू शकत आहोत यावर विश्वासच बसत नसेल, असं नरेंद्र मोदींनी यावेळी म्हटलं. संकटाच्या चक्रव्युहातून रामजन्मभूमी मुक्त झाली, असंही मोदी म्हणालेत.

दरम्यान, आज प्रभू रामाचा जयघोष संपूर्ण जगभरात होत आहे असं सांगत मोदींनी सर्व देशवासी आणि जगभरात असलेल्या भारतभक्त आणि रामभक्तांना शुभेच्छा दिल्या.

महत्वाच्या बातम्या-

“ज्यांच्या रक्तात शिवसेना आणि ज्यांचा प्रत्येक श्वास शिवसेनेसाठी होता, तो अखेर काळाने निष्ठुरपणे थांबवला”

राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर राहुल गांधींचं ट्विट; राम म्हणजे…

“500 वर्षांची प्रतीक्षा संपली, 135 कोटी भारतवासियांसाठी आणि जगातील हिंदूंच्या भावनांना पूर्ण करणारे मोदी पहिले पंतप्रधान

रामाचा वनवास अखेर संपला; ऐतिहासिक राम मंदिराचं भूमिपूजन संपन्न

“राम मंदिराला न्याय मिळवून देणारे गोगाई अन् बाबरीची घुमटे पायापासून उध्वस्त करणारी शिवसेना कुठेच नाही”