Loading...
नागपूर महाराष्ट्र

चंद्रपुरात पोलिसांची लॉजवर धाड; 13 कॉलेज जोडपी ताब्यात

चंद्रपूर | चंद्रपुरातल्या नागपूर महामार्गावरील जनता चौकातील लॉजवर पोलिसांनी धाड टाकून 13 महाविद्यालयीन जोडप्यांना ताब्यात घेतलं आहे. शैक्षणिकदृष्या गजबजलेल्या भागात हा प्रकार उघडकीस आल्याने पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

पोलिसांनी तरूण-तरूणींना अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर लॉजच्या मालकाला देखील ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी मुंबई पोलिस कायद्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Loading...

नागपूर महामार्गावरील जनता चौकातील लॉजवर काहीतरी गैरप्रकार चालू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी धाड टाकत ही कारवाई केली आहे.

दरम्यान, पोलिसांनी सध्या तरी अधिकची माहिती देण्यास नकार दिला आहे. पुढची चौकशी झाल्यानंतर माहिती देऊ, असं पोलिसांनी प्रसिद्धीमाध्यमांना सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-कामं होत नसली की फक्त बहाणे सांगायचे; फडणवीसांची अजित पवारांवर टीका

-नाईट लाईफ करून श्रीमंतांच्या पोरांची सोय केली शेतकऱ्यांचं काय??- फडणवीस

Loading...