तू राजकारणात आलीस. तुझा भाऊ का नाही?; पूनम महाजन म्हणतात…

औरंगाबाद | माझा राजकारणाशी काहीही संबंध नव्हता मला राजकारणात यायचं नव्हतं पण मी अपघाताने आले. वडील गेले कुणीतरी असावं म्हणून मी राजकारणात आले, असं भाजप खासदार पूनम महाजन यांनी सांगितलं आहे. त्या औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात बोलत होत्या.

मला बऱ्याचदा विचारतात तू राजकारणात आलीस. तुझा भाऊ का नाही? तेव्हा मी म्हणते माझा भाऊ माझ्यापेक्षा चांगला चहा बनवू शकतो. का तर आमच्या घरात मुलगा मुलगी असा फरक नव्हता. त्यामुळेच मी राजकारणात आले मात्र माझा भाऊ राजकारणात आला नाही, असं पूनम महाजन यांनी सांगितलं आहे.

राजकारणात आल्यावर मी पहिली निवडणूक जोरदार हरले. त्या निवडणुकीने मला खूप काही शिकवलं. मी पुन्हा कामाला लागले आणि सर्वात अवघड मतदारसंघात काँग्रेसला तोडून फोडून विजय मिळवला, असं पूनम महाजन यांनी सांगितलं.

दरम्यान, मी संसदेमध्ये बसल्यावर सुद्धा घरची सगळी कामं करू शकते. महिला मल्टिटास्किंग असतात. स्त्रीने जर ठरवलं तर ती सर्व काही करून दाखवते, असंही पूनम महाजन यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-“शेतकऱ्यांनो आता वीज बीलं भरुच नका”

-“कर्जमुक्ती हा तर केवळ प्रथमोपचार; शेतकऱ्यांचं जीवनमान बदलाव यासाठी सरकार प्रयत्नशील!”

-किर्तनकारांबद्दल माझ्या मनात नेहमी सन्मानच पण,…- सुप्रिया सुळे

-तरूणाईला ठाकरे सरकारचा दिलासा; 8 हजार पोलिस तर 7 हजार सिक्युरिटी गार्डच्या होणार भरत्या!

-भाजपच्या अधिवेशनात मानापमान नाट्य; अखेर खडसेंना पहिल्या रांगेत बसण्याची संधी