दडी मारलेला पाऊस करणार दैना; पुढील 4 दिवस ‘या’ भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता

मुंबई |  गेल्या काही दिवसांपासून दडी मारुन बसलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रीय होण्याची शक्यता आहे. पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालं असून मुंबईसह महाराष्ट्रातील काही भागात पुढील 4 दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे.

पुढच्या चार ते पाच दिवसात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारपासून जोरदार पाऊस होईल. घाट भागात तर अति मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणेकर हे उकाड्याने हैराण झाले आहेत. अशात ही बातमी या सगळ्यांनाच दिलासा देणारी ठरली आहे. सगळेच जण पावसाची चातकासारखी वाट बघत आहेत.

दरम्यान, मुंबई परिसर, कोकणातील काही भाग आणि मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. इतरत्र पावसाने विश्रांती घेतल्याने पाणीसाठय़ातील वाढ थांबली असून, शेतकऱ्यांकडूनही चिंता व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

देशाच्या राजकारणावर पसरली शोककळा ‘या’ खासदाराचे निधन

‘ज्या नवऱ्यात ताकद असते तो दोन काय चार बायका सांभाळू शकतो’; राम शिंदेच्या टीकेला ‘या’ खासदाराचं प्रत्युत्तर!

सुशांतच्या आत्महत्येच्या रात्री सुशांतसोबत असणाऱ्या मित्राने सांगितली ‘त्या’ रात्रीची कहानी; म्हणाला…

…त्यामुळे सदाभाऊ पिसाळल्यासारखं करत आहेत; राजू शेट्टींचं जोरदार प्रत्युत्तर!

‘राजू शेट्टी म्हणजे गावात सोडलेला वळू’; सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली