“पालघर हत्याप्रकरणाची चौकशी सीआयडीकडून काढून सीबीआयकडे द्यावी”

पालघर | गडचिंचले येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणामध्ये दोन साधु आणि त्यांच्या गाडी चालकाची जमावाकडून हत्या झाली होती. त्या प्रकरणावरुन महाराष्ट्रासोबतच संपुर्ण देशात गदारोळ माजला होता.  या प्रकरणावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुद्धा भरपुर झाले, काही प्रमणावर ते अजूनही चालूच आहेत अशातच  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पालघर प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. ही घटना महाराष्ट्राच्या परंपरेला काळिमा फासणारी आहे. या प्रकरणात पोलीसच पोलिसांचा तपास निष्पक्ष करणार का यावर माझी शंका आहे, असं दरेकर म्हणाले आहेत.

सीआयडीकडून काढून सीबीआयकडे या प्रकरणाची चौकशी दिली जावी, असं मत प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलं आहे. यावेळी प्रवीण दरेकर यांनी पालघर हत्याकांडाच्या व्हिडीओतील नेतेमंडळी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आजूबाजूला फिरतात, असाही आरोप केला आहे.

गृहमंत्र्यांनी पालघरची घटना घडल्यानंतर 20 दिवसांनी भेट दिली. मात्र त्यांनी या भेटीदरम्यान काय साध्य केले? या घटनेची सद्यस्थिती पोलिसांनी केलेला तपास याची माहिती देणे अपेक्षित असताना तसं केलं नाही, असं दरेकरांनी सांगितलंय.

दरम्यान, या घटनेमध्ये पोलीस प्रशासन जितके जबाबदार आहे तितकेच जिल्हा प्रशासन आणि जिल्हाधिकारी देखील जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या कुचराईचीही चौकशी व्हायला हवी, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केलीये.

महत्वाच्या बातम्या-

-अमित शहांच्या तब्येतीविषयी अफवा पसरवणाऱ्या चौघांना गुजरातमध्ये अटक

-मे महिन्याअखेरीस पुण्यातील रुग्णसंख्या 10 हजारावर पोहोचण्याचा अंदाज- आयुक्त शेखर गायकवाड

-दिग्गजांना बाजूला सारत विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून ‘या’ युवा नेत्याला संधी

-…म्हणून साई पल्लवीने धुडकावलं 2 कोटी रुपयांचं मानधन

-कौतुकास्पद! शवविच्छेदन करणाऱ्या कर्मचाऱ्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला महिन्याभराचा पगार