महाराष्ट्र मुंबई

मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची तडकाफडकी बदली!

pravin pardeshi

मुंबई | मुंबई महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांना हटवण्यात आलं आहे. ठाकरे सरकारने मुंबई महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांची बदली केली आहे. प्रवीण परदेशी यांच्या जागी इक्बाल चहल हे मुंबई मनपाचे नवे आयुक्त असतील.

मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या आवरत नसल्याने ही कारवाई केल्याचं सांगण्यात येत आहे. प्रवीण परदेशी यांना नगरविकास विभागात अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली करण्यात आली आहे.

मुंबई महापालिका आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्तांनाही हटवण्यात आलं आहे. मुंबई मनपातील अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाडांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी ठाणे मनपाचे माजी आयुक्त संजीव जैस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रविण परदेशी यांच्या अनेक निर्णय देखील वादात सापडले होते. त्यांच्या या निर्णयांबद्दल अनेक मंत्र्यांनी तक्रारीही केल्या होत्या. त्यांच्यावर परस्पर निर्णय घेतल्याचाही आरोप होत होता.

महत्वाच्या बातम्या-

-‘यंदा फीवाढ करु नका’; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे शिक्षण संस्थांना आदेश

-“दादांनी प्राॅमिस मोडलं”, मेधा कुलकर्णींच्या डोळ्यात आलं पाणी

-“महाराष्ट्रावरचा अन्याय तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही राजकारण करण्यास नालायक आहात”

-लॉकडाउनमध्ये दगडी चाळीत ‘या’ अभिनेत्यासोबत पार पडला अरूण गवळीच्या लेकीचा लग्नसोहळा

-“नमस्ते ट्रम्प कार्यक्रमामुळेच गुजरातमध्ये कोरोना पसरला”