कोरोनाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचा अनोखा उपक्रम

मुंबई | कैद्यांकडे नेहमी नकारात्मक दृष्टीकोनातून पाहिलं जातं. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता कैद्यांचीदेखील महाराष्ट्र पोलिसांना मदत होणार आहे. महाराष्ट्र पोलिसांनी यासंबंधीत आपल्या ट्विटरवरून माहिती दिली आहे.

राज्यातील 9 तुरुंगात 1000 कैदी सुमारे 1 लाख मास्क तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. हे मास्क पोलीस, कैदी आणि राज्य सरकारच्या अनेक विभागातील कर्मचारी वापरणार असल्याचं महाराष्ट्र पोलिसांनी सांगितलं आहे.

देशभरात #COVID19 विरुद्ध विविध उपाययोजना केल्या जात असताना, महाराष्ट्र पोलिसांकडून एक अनोखा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाचं कौतूक केलं जात आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 42वर गेली आहे. राज्यात सर्वाधिक कोरानाग्रस्त पिंपरी तर त्यापाठोपाठ पुण्याचा नंबर लागतो.

 

महत्वाच्या बातम्या-

-कोरोनाचा फटका राज ठाकरेंनाही; मेळावा करावा लागला रद्द

-“सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी नाही मात्र कमी उपस्थितीत काम करण्याबाबत विचार”

-पाकिस्तानमध्येही झाला कोरोनाचा शिरकाव

-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्टेशनवरची गर्दी कमी करण्यासाठी मुंबई रेल्वेने घेतला हा निर्णय 

-सर्व शासकीय कार्यालये 7 दिवस बंद; सरकारचा मोठा निर्णय